इंदापूर

धनंजय वाशिंबेकर मेमोरियल फौंडेशनकडून कोकणवासीयांसाठी मदतीचे आवाहन

संकट काळात माणुसकी जपण्याची गरज

धनंजय वाशिंबेकर मेमोरियल फौंडेशनकडून कोकणवासीयांसाठी मदतीचे आवाहन

संकट काळात माणुसकी जपण्याची गरज

इंदापूर : प्रतिनिधी

माणसांमधली माणूसकी
माणसांनीच जपली जावी
आप-आपसातील आत्मीयता
आपुलकीने टिकली जावी

आलेल्या प्रत्येक संकटावर
सहकार्यानं मात पाहिजे
माणसांकडून माणसांसाठी
मदतीचा सदैव हात पाहिजे
या काव्य पंक्तीप्रमाणेच इंदापूर येथील कै. धनंजय वाशिंबेकर मेमोरीयल फाउंडेशन व अतुल शेटे-पाटील परिवाराकडून कोकणासह कोल्हापूर आणि सांगली भागातील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या आठवड्याभरात कोकण परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे. त्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला. बऱ्याच ठिकाणी दरडी कोसळल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी आणि जीवितहानी झाली.त्यामुळे कोकण वासियांच्या दुःखात सहभागी होऊन मदतीचा हात पुढे करून जास्त दिवस टिकतील असे सुखे पदार्थ,वस्त्रे,अंथरून-पांघरून म्हणून वापरता येणारी जाड कपडे,किराणा व जीवनावश्यक वस्तूंची स्व:इच्छिने मदत करण्याचे आवाहन धनंजय वाशिंबेकर मेमोरियल फौंडेशनकडून करण्यात येत आहे.

कोकणातील लोकांना मदत करण्यासाठी चहूबाजूंनी मदतीचे हात पुढे येत आहेत.आपले कोकण हे फक्त वीकेंड ट्रीप एन्जॉय करण्यापुरते नाही.


या पार्श्वभूमीवर पूरसंकटात आपापल्या परीने शक्य ती कोकणाला साथ द्या,’ पुन्हा एकदा मदतीचा एक हात द्या ‘ असे म्हणत या संकटकाळात इंदापूर शहरवाशीय मदतीस धावून येत मदतीची प्रचिती दाखवून देणार हे नक्कीच….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button