धर्मवीर संभाजीराजे गणेश उत्सव मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर.
आयोजित रक्तदान शिबिरात ३७ बॉटल रक्त संकलित.

धर्मवीर संभाजीराजे गणेश उत्सव मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर.
आयोजित रक्तदान शिबिरात ३७ बॉटल रक्त संकलित.
बारामती वार्तापत्र
धर्मवीर संभाजीराजे गणेशोत्सव तरुण मंडळाच्या वतीने (दि:१७) रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिबिराचे उद्घाटन बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या हस्ते करण्यात आले.आयोजित रक्तदान शिबिरात ३७ बॉटल रक्त संकलित करण्यात आले.
या शिबिरात गावचे उपसरपंच, पोलीस पाटील, गावातील महिला, सोमेश्वर चे आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष विक्रम लकडे यांनी उस्फूर्तपणे रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन पहिल्यांदा रक्तदान केले. यावेळी दूध संघाचे चेअरमन संदीप जगताप, थोपटेवाडी गावच्या सरपंच रेखा बनकर, उपसरपंच कल्याण गावडे, पत्रकार हेमंत गडकरी, पोलीस पाटील नितीन थोपटे, सुनील खलाटे,सुनील गायकवाड, जयवंत अण्णा थोपटे,वसंत जाधव, हरिभाऊ थोपटे, तुकाराम पानसरे, शशिकांत पानसरे, जितेंद्र थोपटे,धनंजय पडवळ, प्रमोद पानसरे, चांगदेव मुळीक, उपस्थित होते.
याप्रसंगी मंडळाच्यावतीने प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संभाजी होळकर म्हणाले की, रक्तदान ही काळाची गरज असून धर्मवीर संभाजीराजे गणेश उत्सव मंडळाने आयोजित केलेला कार्यक्रम हा स्तुत्य असून सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. बारामती तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोविड लसीकरण होत आहे. रक्त संकलन करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्यातच रुग्णांच्या नातेवाईकांना रक्त उपलब्ध करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी स्वतःहून पुढे येऊन रक्तदान करणे गरजेचे असल्याचे मत होळकर यांनी व्यक्त केले.
तसेच रक्तदान शिबिराचा कार्यक्रम दरवर्षी राबवणार असल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले. बारामती ब्लड बँकेच्या वतीने सोमनाथ कवडे व डॉक्टर डी.एन. धवडे यांनीही मंडळाचे आभार व्यक्त केले.