विविध मागण्यांसाठी तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे धरणे आंदोलन…..
मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे

विविध मागण्यांसाठी तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे धरणे आंदोलन…..
मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे
पुणे – प्रतिनिधी
आज महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी शासनाकडे तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्या विविध मागण्या प्रलंबित असून याबाबत शासनाला वेळोवेळी निवेदन देण्यात आले होते परंतु शासनाकडून याबाबत ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही, नायब तहसिलदार आणि तहसीलदार संवर्ग राज्यस्तरीय करण्यात आला असूनदेखील अजून सेवाज्येष्ठता यादी लावण्यात आलेली नाही.
तसेच अनेक वर्षे पदोन्नतीबाबत शासन स्तरावर प्रस्ताव प्रलंबित असून त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही, यामुळे संघटनेच्या सदस्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे, आजच्या आंदोलनात या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
तसेच सर्व राज्यभरात हे आंदोलन करण्यात येत असून सेवा विषयक बाबींमध्ये जर निर्णय झाला नाही तर दि 18/04/2022 रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात येईल, आणि त्यानंतरही मागण्या मान्य झाल्या नाही तर दिनांक 4/05/2022 पासून कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे पुणे जिल्हा अध्यक्ष श्री शिवाजी शिंदे यांनी सांगितले.
यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व नायब तहसिलदार सहभागी झाले होते.