धार्मिक भावना दुखविल्याप्रकरणी एकबोटे बंधूसह कालीचरण बाबा विरुद्ध खडक पोलीस ठाण्या गुन्हा दाखल
घटनेचा व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिपची पडताळणी करून मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय
धार्मिक भावना दुखविल्याप्रकरणी एकबोटे बंधूसह कालीचरण बाबा विरुद्ध खडक पोलीस ठाण्या गुन्हा दाखल
घटनेचा व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिपची पडताळणी करून मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय
प्रतिनिधी
धार्मिक भावना दुखविल्याप्रकरणी एकबोटे बंधूसह कालीचरण बाबा विरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल झालाय. मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजाच्या जातीय भावना दुखविल्याप्रकरणी समस्त हिंदू आघाडी संघटक कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यासह त्यांचे बंधू आणि कालीचरण महाराज यांच्यासह सहा जणांविरोधात खडक पोलीस ठाण्या त हा गुन्हा दाखल झालाय.
पोलीस नाईक यांच्याद्वारे फिर्याद
यासंबंधी पोलीस नाईक सोमनाथ ढगे यांनी फिर्याद दिली असून समस्त हिंदु आघाडी संघटनेचे कार्याध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे मोहनराव शेटे, सामाजिक कार्यकर्ता दीपक बाबुलाल नागपुरे, कालीचरण महाराज (रा. अकोला ) कॅप्टन दिगेंद्रकुमार (रा. राजस्थान), नंदकिशोर रमाकांत एकबोटे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावं आहे.
शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमातला प्रकार
घटनेचा व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिपची पडताळणी करून मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय. रविवारी 19 डिसेंबर 2021 रोजी पुण्यातील सर्व हिंदू संघटनांच्या वतीने रौप्यमहोत्सवी शिवप्रतापदिन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मिलिंद एकबोटे कार्यक्रमाचे आयोजक होते. या सर्व प्रकरणात कालीचरण महाराज मिलिंद एकबोटे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.