धावपळीमध्ये स्वतःचे आरोग्य जपत काम करा :- पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे.
नेत्र तपासणी शिबिरात ५३ पत्रकारांची तपासणी...

धावपळीमध्ये स्वतःचे आरोग्य जपत काम करा :- पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे.
नेत्र तपासणी शिबिरात ५३ पत्रकारांची तपासणी…
बारामती वार्तापत्र
समाज हिताच्या बातम्यांचा आढावा घेत असताना पत्रकार बांधवांनी स्वतः ची देखील काळजी घेतली पाहिजे. आपण समाजासाठी काम करत आहोत. व आपले देखील कुटुंब आहे. त्यांना देखील वेळ देऊन काम करत राहिले पाहिजे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी केले.
बारामती शहरातील सुप्रसिद्ध डॉ राठी यांच्या प्रिझ्मा आय केअर या रुग्णालयात पत्रकार बांधवांसाठी बारामतीत मोफत डोळे तपासणी शिबीरचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. दरम्यान शिबिरात ५३ पत्रकारांची नेत्र तपासणी करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट याची प्रमुख उपस्थिती होती.
रोजच्या घडामोडींवर लक्ष ठेवून काम करणाऱ्या पत्रकार बांधवांचे सातत्याने मोबाईलवर किंवा कंम्प्युटरवर काम सुरु असते. त्यामुळे डोळ्यांचा त्रास होतो. याच अनुषंगाने नियमित तपासणी करून डोळ्यांची काळजी घेणे कामी हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.
आजच्या परिस्थितीत पत्रकार बंधु महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. अन्यायाचा प्रतिकार करताना व लोकशाही चे रक्षण करताना स्वतः ची देखील प्रकृती सांभाळली पाहिजे. त्यासाठी सर्व पत्रकार बंधुनी एकत्र येत असे कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत असे भगवानराव वैराट म्हणाले .यावेळी भगवानराव वैराट यांनी स्वतः देखील डोळे तपासणी करून शिबीराला शुभेच्छा दिल्या. दरम्यान उपस्थित पत्रकार बांधवाचे व प्रमुख पाहुण्यांचे आभार योगेश नालंदे यांनी मानले.