स्थानिक

सन्मान रणरागिणींचा ,,, महिला सरपंचाचा

महिलांचा प्रतिभावंत गुणगौरव या उपक्रमात सत्कार करण्यात आला

सन्मान रणरागिणींचा ,,, महिला सरपंचाचा

महिलांचा प्रतिभावंत गुणगौरव या उपक्रमात सत्कार करण्यात आला

बारामती वार्तापत्र

माजी कृषिमंत्री शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सन्मान साहेबांच्या महिला धोरणाचा,, सन्मान महिला कर्तुत्वाचा या कार्यक्रमाचे आयोजन बारामती तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राष्ट्रवादी भवन, बारामती येथे करण्यात आले होते.यामध्ये समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि फक्त चूल आणि मूल या व्याख्येत महिलांना न समजता त्यांनी केलेल्या कार्याचा योग्य सन्मान व्हावा त्यांना व त्यांच्याबरोबर इतर महिलांना प्रोत्साहन मिळावे म्हणुन 23 महिला सरपंचांचा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा ‘प्रतिभावंत गुणगौरव’ या उपक्रमात सत्कार करण्यात आला.
तसेच महिलांसाठी तयार झालेला नवीन कायदा अमलात आलेला आहे. त्या शक्ती कायदया विषयी महिलांना सखोल माहिती व्हावी, या उद्देशाने ऍड सुप्रियाताई बर्गे यांनी सर्व महिलांना मार्गदर्शन केले व त्यातील तरतुदी सांगितले या कार्यक्रमाला सौ पौर्णिमाताई तावरे नगराध्यक्षा, संभाजी नाना होळकर तालुकाध्यक्ष,डॉ सुहासिनी सातव, सभापती महिला बालकल्याण, सुप्रिया बरवे अध्यक्ष यशस्विनी फाउंडेशन, संगीताताई धावां माजी पंचायत समिती सदस्य, भाग्यश्री धायगुडे ,अध्यक्ष युवती राष्ट्रवादी बारामती तालुका, कार्याध्यक्ष बारामती तालुका यांचे उपस्थितीत झाला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष वनिता बनकर यांनी केले. तर सूत्रसंचालन नुसरत इनामदार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अश्विनी गाडेकर दीपाली पवार सुचिता साळवे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Related Articles

Back to top button