नऊवारी साडी परिधान केलेले सायकलपटू कधी पाहिले आहेत का
बारामतीच्या महिलांनी काढली बारामती ते पंढरपूर सायकल रॅली
नऊवारी साडी परिधान केलेले सायकलपटू कधी पाहिले आहेत का
बारामतीच्या महिलांनी काढली बारामती ते पंढरपूर सायकल रॅली
बारामती वार्तापत्र
सायकलिंग म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर येतात ते खेळाडूंचा पोशाख घातलेले सायकल पट्टू मात्र बारामतीतील महिला सायकल पटूनी नऊवारी साडी परिधान करून नुकतीच सायकल रॅली काढली.
बारामती येथील बारामती सायकल क्लब च्या महिला सदस्यांनी रविवारी बारामतीतून पंढरपूर असा 111 किमीचा टप्पा सायकलीवरून पार केला या सर्व महिलांनी नऊवारी साडी घालून हे सायकलिंग केले लहानांपासून ते अगदी साठ वर्षाच्या वयस्कर महिलाही उत्साहाने या सायकल रॅलीत सहभागी झाल्या होत्या.
सायकल पासून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही उलट उत्तम आरोग्य लाभते. हल्लीच्या युगात सायकलिंग हा एक आरोग्यासाठी उत्तम पर्याय आहे त्यामुळे आम्ही उत्तम आरोग्याचा संदेश देण्यासाठी या सायकल रॅलीचे आयोजन केले आहे असे महिलांनी सांगितले या रॅलीमध्ये लता विजय दराडे श्रद्धा विजय दराडे जानवी नीलेश घोडके ऋतुजा राजेंद्र भुंजे शुभम श्री सुभाष चौधर मंगल राऊत रूपाली विनायक तारू साक्षी विनायक तारू समीक्षा विनायक तारू अनुष्का राऊत अंकिता मुकुंद जाधव द्वारका कैलास कारंडे अनिता आटोळे यांनी सहभाग घेतला.
ही रॅली पंढरपूरला पोहोचल्यावर आमदार परिचारक कुटुंबीयांकडून या महिलांचा सत्कार करण्यात आला लता विजय दराडे आणि श्रद्धा विजय दराडे या मायलेकींनी एक जानेवारी रोजी बारामती आळंदी असा सायकल प्रवास पूर्ण केला होता त्या प्रेरणेतून आजची ही सायकल सफर झाली होती