नगरपरिषदेची सभा सभागृहात घेण्याची मागणी
अधिवेशन होते मग नगरपालिकेची सभा सभागृहात का नाही?
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपरिषदेची स्थायी व विषय समित्यांची रचना करण्याच्या विषयाबाबतची सभा १६फेब्रुवारी रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित करण्यात आली आहे. ही सभा ऑनलाईन घेण्यास आपला विरोध आहे. सभा नगरपरिषदेच्या सभागृहात ऑफलाईन घ्यावी,अशी
मागणी नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते सुनील सस्ते यांनी केली आहे.
याबाबत सस्ते यांनी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांना पत्र दिले आहे. त्यामध्ये सस्ते यांनी ही मागणी केली आहे. नगरपरिषदेच्या मा.शरदचंद्रजी पवार सभागृहात २०० सदस्य व अधिकारी व पदाधिकारी बसण्याची आसन क्षमता आहे.
एवढी प्रशस्त आणि मोठी क्षमता असताना स्थायी आणि विषय समित्यांची रचना करणेसारख्या महत्त्वपूर्ण विषयाबाबतची सभा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेऊनये.
ज्याप्रमाणे केंद्र सरकारचे अधिवेशन सभागृहात होते,राज्याचे अधिवेशन विधानभवन मुंबईत होते. त्याच पध्दतीने सबंधित सभा नगरपरिषदेच्या शरदचंद्रजी पवार सभागृहात घेण्यात यावी.
सध्या शहरात मंत्री महोदयांचे कार्यक्रम हजारोंच्या उपस्थितीत होत असतात. या कार्यक्रमास आपण स्वता उपस्थितीत असता. आपल्यासारख्या जबाबदार अधिकारी महोदयांनी सभा
स्थळाची पाहणी करुन संबंधित सभा सभागृहात पार पाडावी,असा टोला देखील सस्ते यांनी लगावला आहे.