डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मानवतेच्या कल्याणासाठी: किरण गुजर
या प्रसंगी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मानवतेच्या कल्याणासाठी: किरण गुजर
या प्रसंगी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले
बारामती वार्तापत्र
जगातील मानवतेच्या कल्याणासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन बारामती नगरपरिषद चे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथे आयोजित आंबेडकर जयंती निमित्त पूजा पाठ च्या कार्यक्रम प्रसंगी गुजर बोलत होते
या प्रसंगी मा. उपनगराध्यक्ष अभिजित जाधव,मा नगरसेवक सुधीर पानसरे,मातंग एकता आंदोलन चे उत्तमराव शिंदे,संगीता लांडगे,दिलीप सोनवणे,प्रा मोहन इंगळे,पत्रकार सुनील शिंदे,संतोष शिंदे, राजेंद्र मांढरे आदी मान्यवर उपस्तीत होते.
महामानवाच्या जयंती महोत्सव च्या माध्यमातून समाज प्रबोधन करून समाज जागृती करण्याचे कार्य भाऊसाहेब मांढरे मित्र परिवार च्या माध्यमातून करीत असल्याचे आयोजक मा उपनगराध्यक्ष व नगरसेवक बिरजू मांढरे यांनी सांगितले . या प्रसंगी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले व वक्तृत्व स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थीचा सन्मान करण्यात आला.
श्री मांढरे,सचिन मांढरे,किरण बोराडे ,धनंजय तेलंगे ,दत्ता चांदणे,कालिदास बल्लाळ,अंकुश मांढरे,राजेंद्र दिवटे, राजू मांढरे,आदी नि मान्यवरांचे स्वागत केले तर विजय तेलंगे यांनी आभार मानले






