नगरपरिषद गाळेधारकांच्या भाडेवाढी विरोधात गाळेधारक संघटना आक्रमक….
दिलेल्या पत्राला दाखवली केराची टोपली....

नगरपरिषद गाळेधारकांच्या भाडेवाढी विरोधात गाळेधारक संघटना आक्रमक….
दिलेल्या पत्राला दाखवली केराची टोपली….
बारामती वार्तापत्र
2013 पासुनचा तहकूब आसणारा विषय, वर्षभर गाळे बंद आसल्याचे माहीत आसताना सात वर्षा नंतर केला गेला मंजुर ….
2021 पासुन प्रतिवर्ष 5% भाडेवाढ आकारावी….
कोरोनामुळे गेली दोन वर्षे व्यवसाय अडचणीत असतानाही बारामती नगरपरिषदेने त्यांच्या मालकीच्या गाळ्यांचे भाडे वाढविले आहे. यासंदर्भात गाळेधारक असोसिएशनने उपमुख्यमंत्री अजित पवार व नगर परिषदेकडे केलेली भाडेवाढ योग्य नसल्याचे कळवले होते. परंतु याबाबत नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय न घेता, उपमुख्याधिकारी यांनी याला केराची टोपली दाखवली आहे.
वास्तविक पाहता नगरपरिषदेच्या कुठल्याही उद्योग भवनात गाळ्यांमध्ये कोणत्याही सोयीसुविधा पुरवल्या जात नसताना 2013 सालापासून भाडेवाडी संदर्भात असणारा विषय, तहकूब ठेवण्यात आला होता. परंतु तरीदेखील कोरोना महामारी च्या काळात, वर्षभर नगर परिषदेचे सर्व गाळे बंद असल्याचे माहित असून देखील 18 मार्च 2020 रोजी सर्वसाधारण सभा क्रमांक 7 विषय क्रमांक 8, ठराव नंबर 65, 66 मध्ये हा विषय मंजूर केला असून त्यामुळे 2013 प्रति वर्ष गाळेधारकांना पाच टक्के भाडेवाढ होणार आहे ही जाचक भाडेवाढ केली असून, त्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन पुन्हा: सांगण्यात येणार आहे त्यानंतरच आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.
बारामती नगर परिषदेच्या उपमुख्याधिकारी यांनी बारामती नगर परिषद गाळेधारक असोसिएशनला कळवले आहे की, नगरपरिषद मालकीच्या गाळ्यांचे भाडे व भाडे दरातील वाढ त्रिसदस्यीय समिती मार्फत ठरवली जाते त्रिसदस्यीय समितीने ठरल्यानुसार वेळोवेळी भाडे दरात वाढ करण्यात येते. त्यानुसार वेळोवेळी लिलाव झालेल्या गाळ्यांच्या भाड्यामध्ये सन 2013 व 2016 मध्ये भाडेवाढ करण्यात आलेली आहे. असे नमूद करण्यात आले आहे. वास्तविक पाहता हा विषय तहकूब असताना, वर्षभर गाळे बंद असताना,2020 साली हा विषय मंजूर करण्यात आला आहे.
सदर भाडेवाढ रद्द किंवा कमी करण्याबाबत नगरपरिषद अधिनियमामध्ये तरतूद आढळ होत नाही असे कळविले आहे. तसेच कोरोना कालावधीमध्ये नगरपरिषद मालकीच्या भाडेपट्ट्याने दिलेल्या गाळ्यांचे भाडे माफ करण्याबाबत कोणताही शासन निर्णय झालेला नाही. तरी आपला अर्ज नस्ती बंद करण्यात येत आहे. असे नमुद केलंय.
त्यामुळे नगरपरिषद गाळेधारकांत तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.