राजकीय

नगराध्यक्ष सचिन सातव यांचा मुख्याधिकारी यांच्या व्हायरल व्हिडिओबाबत खुलासा

मी सर्वांना हातात हात देऊन नमस्कार करतो.

नगराध्यक्ष सचिन सातव यांचा मुख्याधिकारी यांच्या व्हायरल व्हिडिओबाबत खुलासा

मी सर्वांना हातात हात देऊन नमस्कार करतो.

बारामती वार्तापत्र 

अलीकडेच नगराध्यक्षपदाचा सत्कार समारंभ व पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमादरम्यान घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून त्याबाबत नगराध्यक्ष सचिन सातव यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

कार्यक्रमाच्या वेळी मुख्याधिकारी यांनी नगराध्यक्ष सचिन सातव यांचा सत्कार करताना त्यांना बुके देत हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या क्षणी सचिन सातव बुके घेतल्यानंतर पाठीमागे ठेवत असताना व मुख्याधिकाऱ्यांनी हातात हात देण्यासाठी हात पुढे केला.त्यामुळे हस्तांदोलन झाले नाही. हाच प्रसंग व्हिडिओच्या माध्यमातून पसरला असून काही जणांकडून त्याचा चुकीचा अर्थ लावला जात आहे.

या पार्श्वभूमीवर सचिन सातव यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की,आणि मी सर्वांना हातात हात देऊन नमस्कार करतो.

बुके स्वीकारताना क्षणिक गडबड झाली आणि त्यामुळे हस्तांदोलन होऊ शकले नाही. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे नगराध्यक्ष सचिव सातव यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले.

Back to top button