स्थानिक

नगराध्‍यक्षा पोर्णिमाताई तावरे यांचे हस्‍ते तांदूळ महोत्‍सवाचे उद्घाटन

कृषि भवन , प्रशासकीय इमारत , बारामती येथे करण्‍यात आले.

नगराध्‍यक्षा पोर्णिमाताई तावरे यांचे हस्‍ते तांदूळ महोत्‍सवाचे उद्घाटन

कृषि भवन , प्रशासकीय इमारत , बारामती येथे करण्‍यात आले.

बारामती वार्तापत्र

विकेल ते पिकेल अभियान , संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार शेतकरी ते थेट ग्राहक विक्री अंतर्गत पुरंदर तालुक्‍यातील शेतकरी गटांनी उत्‍पादीत केलेले दर्जेदार इंद्रायणी तांदूळ महोत्‍सवाचे उद्घाटन आज बारामतीच्‍या नगराध्‍यक्षा पोर्णिमाताई तावरे यांचे हस्‍ते कृषि भवन , प्रशासकीय इमारत , बारामती येथे करण्‍यात आले.

यावेळी पंचायत समिती सभापती निता बारावकर, नगरपालिका गटनेते सचिन सातव, उपसभापती पंचायत समिती प्रदिप धापटे, डॉ. किर्ती पवार, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्‍वर बोटे, उपविभागीय कृषि अधिकारी बालाजी ताटे, तालुका कृषि अधिकारी दत्‍तात्रय पडवळ, तंत्र अधिकारी सुप्रिया बांदल तसेच कृषि विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

उद्घाटनानंतर सर्व मान्‍यवरांनी प्रत्‍येक स्‍टॉलला भेट देवून स्‍टॉलधारकांनी विक्रीसाठी आणलेल्‍या साहित्‍याची माहिती घेतली व साहित्‍य खरेदीही केली. या महोत्‍सवामध्‍ये महालक्ष्‍मी महिला शेतकरी बचत गट, ओमसाई शेतकरी गट, मु.पो.मांढर, भैरवनाथ शेतकरी गट, धनकवडी, जानाई शेतकरी गट, दवणेवाडी ता.पुरंदर, जिवामृत सेंद्रिय शेतकरी बचत गट, सावंतवाडी, महिला बचत गट, पवईमाळ, स्‍वराज्‍य गूळपट्टी, पणदरे, विषमुक्‍त भाजीपाला विक्री केंद्र, विश्‍वासनगर गुणवडी रोड, एकता सेंद्रीय गट मळद, ता.बारामती इत्‍यादी गटांनी या महोत्‍सवामध्‍ये सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram