नजरकैदेत असलेल्या उद्योजक अविनाश भोसले यांना 8 जूनपर्यंत सीबीआय कोठडी
रिअल इस्टेट किंग अशीही त्यांची ओळख आहे.
नजरकैदेत असलेल्या उद्योजक अविनाश भोसले यांना 8 जूनपर्यंत सीबीआय कोठडी
रिअल इस्टेट किंग अशीही त्यांची ओळख आहे.
क्राईम;बारामती वार्तापत्र
डीएचएफएल येस बँक प्रकरणात अविनाश भोसले यांना 8 जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. डीएचएफएल आणि येस बँक प्रकरणात सीबीआयने अटक केलेल्या अविनाश भोसले यांना मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने 8 जून पर्यंत CBI कोठडी दिली.
सीबीआयने अविनाश भोसले यांना 26 मे रोजी पुण्यातून अटक केली होती. त्यानंतर मुंबईतील सीबीआय कोर्टात त्यांना 27 मे रोजी हजर करण्यात आले होते. सीबीआयनं भोसलेंची 10 दिवसांकरता रिमांड मागितली होती. मात्र सीबीआयची कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा करत भोसलेंच्या वकिलांनी रिमांडला विरोध केला होता. कोर्टाने हा दावा फेटाळला आहे.
नेमकं प्रकरण काय – पुण्याचे बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना गुरुवारी रात्री CBI कडून अटक करण्यात आली. DHFL प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. यातूनच त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षी जून 2021 मध्ये अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांच्या नावावर असलेली तब्बल 40 कोटी 34 लाख रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली होती. विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली होती.
DHFL घोटाळा प्रकरणानंतर त्यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. अविनाश भोसले आज कोट्यवधी रुपयांच्या DHFL ग्रुपचे मालक आहेत. रिअल इस्टेट किंग अशी त्यांची पुण्यामध्ये ओळख आहे. अविनाथ भोसले यांच्या ओळखीतील लोक सांगतात की 80 च्या दशकात ते रिक्षा चालवत असत. बांधकाम व्यवसायात आल्यानंतर सुरुवातीला कंत्राटदार ते आता पुण्यातील रिअल इस्टेट किंग अशी त्यांची ओळख आहे.
कोण आहेत अविनाश भोसले?
अविनाश भोसले हे पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. रिअल इस्टेट किंग अशीही त्यांची ओळख आहे. अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. कोट्यवधी रूपयांचा एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत. आता बांधकाम क्षेत्राशी संबंधित शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर झालेली कारवाई ताजी असतानाच ईडीने भोसले यांच्यावरही कारवाईचे पाऊल उचलल्याने मोठी खळबळ उडाली आहे.