शालेय शासकीय थायबॉक्सिंग स्पर्धेत ज्ञानसागर गुरुकुलचे वर्चस्व; ४ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय निवड
क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश संपादन

शालेय शासकीय थायबॉक्सिंग स्पर्धेत ज्ञानसागर गुरुकुलचे वर्चस्व; ४ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय निवड
क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश संपादन
बारामती वार्तापत्र
शालेय शासकीय थायबॉक्सिंग स्पर्धेत ज्ञानसागर गुरुकुल, सावळ येथील विद्यार्थ्यांनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत ज्ञानसागर गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी विविध गटांत उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांची कमाई केली असून, चार विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय थायबॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत सार्थक ताकमोगे, सुकृत तुपे, प्रतीक गवळी आणि सोहेल खान यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकावत राज्यस्तरीय स्पर्धे साठी निवड झाली.
काव्या मजगर हिने द्वितीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली.तसेच संकुल देवकर, श्रावणी जाधव, आकांक्षा लोखंडे, स्नेहल दराडे व सिद्धी साबळे यांनी तृतीय क्रमांक मिळवून गुरुकुलच्या यशात मोलाची भर घातली.
ज्ञानसागर गुरुकुलमध्ये केवळ शैक्षणिक प्रगती नव्हे तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर दिला जातो. क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सागर आटोळे यांनी सांगितले.






