नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा
पाणीपातळी झपाट्याने वाढत असल्याने जलसंपदा विभागाकडून आव्हान

नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा
पाणीपातळी झपाट्याने वाढत असल्याने जलसंपदा विभागाकडून आव्हान
बारामती वार्तापत्र
निरा देवघर धरण पाणलोट श्रेत्रात पावसाचा जोर भरपुर असल्याने धरणाची पाणी पातळी 659.40 मीटर अर्थात 8280 दलघफू म्हणजे 69 टक्के इतकी झाली आहे. मागील 12 तासात 2422 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा आलेला आहे. म्हणजे सरासरी ५६ हजार ४५ क्युसेक्सने विसर्ग येत असल्याने उद्या सकाळपर्यंत पाणीसाठयात वाढ जास्त प्रमाणात होऊ शकते.
निरा देवघर धरणातून पाणी वीर धरणात येते. वीर धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वीर धरणातून पाणी नीरा नदीच्या पात्रात सोडले जाईल. खंडाळा, फलटण, माळशिरस, बारामती, पंढरपूर, तालुक्यातील नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून उद्या (ता. २३) दुपारनंतर पाणीसाठा व पडणारा पाउस बघून निर्णय घेतला जाइल असे साहाय्यक अभियंता विजय नलावडे यांनी सांगितले.
त्यामुळे नदीपात्रात पाणी केव्हाही सोडले जाऊ शकते त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे असे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे