नर्सिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांना जपान-जर्मनीमध्ये नोकरीची नामी संधी
जय इन्स्टिट्यूट आँफ नर्सिंग घेणार पुढाकार
नर्सिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांना जपान-जर्मनीमध्ये नोकरीची नामी संधी
जय इन्स्टिट्यूट आँफ नर्सिंग घेणार पुढाकार
इंदापूर :प्रतिनिधी
ए.एन.एम.आणि जी.एन.एम.या नर्सिंग क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या युवक-युवतींना परदेशात नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देऊन त्यांना या क्षेत्रात भविष्य घडविण्यासाठी जय इन्स्टिट्यूट आँफ नर्सिंग इंदापूर आणि लिओ अँण्ड सँजिटेरिअर्स प्रा.लि.या संस्थेने पुढाकार घेतला आहे. याबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यासाठी शुक्रवारी (दि.२२) जय इन्स्टिट्यूट आँफ नर्सिंग काॅलेज इंदापूर येथे मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अरविंद सावंत,डाॅ.निशिकांत सावंत, शरद पानसरे,लिओ अँण्ड सँजिटेरिअर्स प्रा.लि.चे कवी लुथरा व जे.पी.बी.स्किलर्स प्रा.लि.चे डायरेक्टर प्रणीत भुतांगे हे आवर्जून उपस्थित होते.
याप्रसंगी कवी लुथरा म्हणाले की,भारत सरकार नियंत्रित ओराएन साशी या संस्थेच्या माध्यामातून मागील अनेक वर्षापासून युवक – युवतींना विविध देशात नोकरीच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जात आहेत.त्याच धर्तीवर ए.एन.एम.आणि जी.एन.एम.च्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या माध्यमातून २०२२ साठी जपान आणि जर्मनी या दोन देशात नर्सिंग क्षेत्रात संधी उपलब्ध आहे.
जपान या देशाकरीता ए.एन.एम.आणि जी.एन.एम. किंवा बी.एस.सी.नर्सिंग शिक्षण घेतलेले यासाठी पात्र आहेत.तर जर्मनी मध्ये केवळ बी.एस.सी.नर्सिंग आणि जी.एन.एम. शिक्षण घेतलेले विद्यार्थी विद्यार्थीनी नोकरी करु शकतात.या दोन्ही साठी वय वर्षे १८ ते ३० अशी अट आहे.ज्यांना या क्षेत्रात आपले करीअर करायचे आहे त्यांना ही संस्था प्रक्षिक्षण देखील देणार आहे.
प्रणीत भुतांगे म्हणाले की,सध्या युवक आणि युवतींना परदेशात रोजगाराच्या नामी संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे आणि मार्गदर्शनाचे काम लिओ अँण्ड सँजिटेरिअर्स प्रा.लि. ही संस्था करीत आहे.ज्यावेळी तुम्ही भारताबाहेर जपान किंवा जर्मनी सारख्या देशात किमान पाच वर्षे जावून नोकरी करता त्यावेळी अनेक बाजूंनी तुम्ही घडत असता. चांगला पगार तर मिळतो मात्र आयुष्यभरासाठी त्या देशाचा शिक्का तुमच्या नावापुढे लागला जातो.भारतात परतल्यानंतर ही नामांकित रूग्णालयात नोकरी मिळवू शकता. याशिवाय जपान सारख्या प्रगत, तंत्रज्ञान व कौशल्य असणाऱ्या देशात तुम्हाला जे प्रशिक्षण आणि अनुभव मिळतो तो जगाच्या पाठीवर नक्कीच मोठा आहे. आपण नर्सिंग क्षेत्रात जेव्हा उतरतो तेव्हा आपण उदिष्ठे,स्वप्न डोळ्यासमोर ठेवलेली असतात निश्चित ती पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही आपल्या सोबत आहोत.
यावेळी जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चे संस्थापक जयंत नायकुडे म्हणाले की, नर्सिंग हे क्षेत्र कधीही न संपणारे क्षेत्र आहे. जे विद्यार्थी -विद्यार्थीनी या क्षेत्रात शिक्षण घेत आहेत त्यांच्या पुढे ही एक नामी संधी आहे. याचा गांभीर्याने विचार केल्यास तुम्ही तुमचे भविष्य घडवू शकता. त्यासाठी मनाची तयार आणि प्रबळ इच्छाशक्ती असायला हवी.कोरोना सारख्या महामारीत भारतालाच नव्हे तर जगाला नर्सिंग क्षेत्राचे महत्व पटले असून यापुढील काळात ही या क्षेत्राला फार महत्व राहणार आहे. नर्सिंग क्षेत्रात जो शिक्षण घेतो तो कधीही रोजगाराविना पडून राहत नाही. तो स्वतःच्या पायावर उभा राहतो.