नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व सेवानिवृत्त शिक्षकांचा तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने सन्मान
इंदापूर पंचायत समिती येथे छोटेखानी सन्मान सोहळा संपन्न
नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व सेवानिवृत्त शिक्षकांचा तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने सन्मान
इंदापूर पंचायत समिती येथे छोटेखानी सन्मान सोहळा संपन्न
इंदापूर : सिद्धार्थ मखरे ( प्रतिनिधी )
इंदापूर तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या व इंदापूर तालुक्यांमध्ये अनेक वर्षे सेवा बजावलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांचा आज (दि.२२) रोजी इंदापूर पंचायत समिती सभापती यांच्या दालनात छोटेखानी सन्मान सोहळा संपन्न झाला.
यावेळी सरडेवाडी ग्रामपंचायतच्या नूतन सदस्य पदी निवड झाल्याबद्दल रवींद्र सरडे,सिताराम जानकर,विजय शिद,आप्पासाहेब माने व गोकुळ कोकरे तर तरंगवाडी ग्रामपंचायत सदस्यपदी नूतन निवड झाल्याबद्दल तुकाराम करे,कौठळी ग्रामपंचायतचे प्रकाश काळेल व बापूसाहेब चितारे आदी नुतन सदस्यांचा तेजपृथ्वी ग्रुप व नानासाहेब खरात मित्र परिवाराच्या माध्यमातून फेटा बांधून यथोचित सन्मान करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच यावेळी बाभुळगाव येथील युवा नेतृत्व अमोलराजे इंगळे यांनी बाभूळगाव ग्रामपंचायतमध्ये मोठया फरकाने विजय मिळवल्याबद्दल अमोलराजे इंगळे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी नवनिर्वाचित सदस्य तुकाराम करे म्हणाले की, तेजपृथ्वी ग्रुप च्या माध्यमातून सत्काररुपी जी शाब्बासकीची थाप दिली आहे,त्यामुळे निश्चितपणे भविष्यात आणखी जोमाने काम करण्यास बळ मिळणार आहे.एकवेळ जिल्हा परिषद सदस्य होणे खुप सोपे आहे.मात्र ग्रामपंचायत सदस्य होणे आणि त्याही पलिकडे सरपंच होणे खूप अवघड आहे.कारण गावपातळीवर खुप गट तट वाद-विवाद असतात आणि त्यातून लढाई जिंकायची असते. या सत्कार समारंभाच्या वतीने भविष्यातील काळात मतदारांना जे वचन दिले आहे, ते पूर्ण करुन आम्ही सर्व सदस्य गावाचा नावलौकिक होईल असे काम करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जाधववाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली. ही ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात हनुमंत यमगर यांनी महत्वाची भुमिका बजावली म्हणून त्यांचा पांडुरंग मारकड यांच्या हस्ते तेजपृथ्वी ग्रुप च्या माध्यमाधून यथोचित सन्मान करण्यात आला.
दरम्यान सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मण करडे व सौ.कांता लक्ष्मण करडे यांचा देखील यथोचित सन्मान करण्यात आला. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की,शिक्षक म्हणून इंदापूर तालुक्यातील विविध शाळांवर ज्ञानदानाचे काम केले. पदवीधर शिक्षक म्हणून ही अनेक ठिकाणी सेवा बजावण्याची संधी मिळाली.१९९० पासून विद्यार्थी प्रियता यास प्रथम स्थान देऊन गुरु म्हणजे समाज घडवणारा घटक असतो यास वचनबध्द राहून अनेक विद्यार्थी घडवले. अपंगांसाठी सर्व शिक्षण अभियानाअंतर्गत काम केले.वेळप्रसंगी इंदापूर पंचक्रोशीत परिसरात पायी गेलो मात्र कामात हयगय केली नाही. तत्कालीन शिक्षणमंत्री रामकृष्ण मोरे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार ही मिळाला. नवनिर्वाचित सदस्यांनी समाजहीत पाहून भविष्यात काम करा नक्कीच गाव बदलल्या शिवाय राहणार नाही हा कानमंत्र त्यांनी दिला.
“इंदापूर पंचायत समितीच्या सभापती पदी महिला असल्याने या कार्यालयात महिलांचा सन्मान व्हावा या सामाजिक जाणिवेतून तेजपृथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा अनिता नानासाहेब खरात यांच्याकडून पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट देण्यात आली. इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी त्याचा स्वीकार केला.”
यावेळी पुणे जिल्हा कुस्तीगिर संघाचे सदस्य महेंद्र रेडके,माजी उपसभापती पांडुरंग मारकड,ग्रा.सदस्य गणेश शिंगाडे,सुधीर पाडुळे,तेजपृथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा अनिता नानासाहेब खरात आदी उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमाचे प्रस्ताविक नानासाहेब खरात यांनी केले.तर आभार पुणे जिल्हा कुस्तिगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके यांनी मानले.