नवनिर्वाचित वकील संघटना कार्यकारिणीचा प्रवीण माने यांच्यावतीने सत्कार
कार्यकारणी नक्कीच प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर

नवनिर्वाचित वकील संघटना कार्यकारिणीचा प्रवीण माने यांच्यावतीने सत्कार
कार्यकारणी नक्कीच प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर
इंदापूर,आदित्य बोराटे –
इंदापूर तालुका वकील संघटनेच्या कार्यकारिणीची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत निवडून आलेले कार्यकारणी बिनविरोध निवडून आली असून या सर्व वकील कार्यकारिणीचा इंदापूर तालुक्याचे भारतीय जनता पक्षाचे युवा नेते प्रवीण माने यांनी आपल्या सोनाई पॅलेस या निवासस्थानी सत्कार केला.
कुठल्याही सामाजिक संस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडणे हे अतिशय समजूतदारीचे व समन्वयाचे प्रतीक असून या गोष्टीचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे या निमित्ताने आज हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असल्याचे प्रतिपादन या सत्कार समारंभाचे निमित्ताने प्रवीण माने यांनी केले.
तसेच जनसामान्यांच्या अडीअडचणींना साथ देऊन ही कार्यकारणी नक्कीच प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर असेल हा विश्वास यावेळी प्रवीण माने यांनी व्यक्त केला. आज सोनाई पॅलेस येथे पार पडलेल्या सत्कार समारंभाच्या निमित्ताने
अध्यक्ष adv साहिल खान, अध्यक्ष adv माधव शितोळे, उपाध्यक्ष adv संदीप शेंडे, उपाध्यक्ष adv राम इजगुडे, सचिव adv सुजित गायकवाड, ग्रंथपाल adv शंतनू सवाणे, खजिनदार adv सुमित वाघमारे, सदस्य adv नवनाथ सोनटक्के, महिला प्रतिनिधी adv ज्योती जगताप या मान्यवरांचा सत्कार पार पडला. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष साहिल खान यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे इंदापूर शहर मंडल अध्यक्ष किरण गाणबोटे, पूर्व मंडल अध्यक्ष राम आसबे, adv आशितोष भोसले, adv अवधूत डोंगरे, adv जिमी मुलाणी, adv सचिन राऊत, adv मयूर शिंदे, नितीन आरडे, शिवाजी देवकर, सुयोग सावंत व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.