नवीन वर्षाचे स्वागत करतानाच खिश्याला झळ, एटीएममधून पैसे काढणे होणार महाग
जितकी रक्कम काढणार आहात तिच्या 0.50 टक्के वा प्रति व्यवहार 25 रुपयांपर्यंत ग्राहकाला भूर्दंड पडणार आहे.
नवीन वर्षाचे स्वागत करतानाच खिश्याला झळ, एटीएममधून पैसे काढणे होणार महाग
जितकी रक्कम काढणार आहात तिच्या 0.50 टक्के वा प्रति व्यवहार 25 रुपयांपर्यंत ग्राहकाला भूर्दंड पडणार आहे.
प्रतिनिधी
नवीन वर्षा पासून बँक ग्राहकांना सेवांपोटी अधिक शुल्काचा फटका बसणार आहे. अनेक बँकांनी आर्थिक आणि गैरआर्थिक सेवा नियमांत बदल केले आहेत. हे बदल येत्या नवीन वर्षात 1 जानेवारीपासून लागू होतील. पोस्ट खात्यातंर्गत असलेल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकनेही एटीएम व्यवहार, बँक व्यवहार नियमांमध्ये बदल केला आहे. 1 जानेवारीपासून हे नवीन नियम लागू होतील. नवीन वर्षाचे स्वागत करतानाच खिश्याला झळ पोहचविणाऱ्या या नवीन नियमांबद्दल ग्राहकांनी जागरुक रहावे.
सर्वात अगोदर टपाल खात्याच्या पेमेंट बँकेविषयी जाणून घेऊयात. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून (IPPB) सुरुवातीचे चार व्यवहारावर शुल्क आकारणी करण्यात येणार नाही. तुम्हाला निःशुल्क रक्कम काढता येईल. मात्र त्यानंतर बचत खात्यातून अथवा एटीएममधून व्यवहार केल्यास शुल्क आकारणी करण्यात येईल. जितकी रक्कम काढणार आहात तिच्या 0.50 टक्के वा प्रति व्यवहार 25 रुपयांपर्यंत ग्राहकाला भूर्दंड पडणार आहे.
व्यवहार केला तर शुल्क मोजा
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या (IPPB) बचत खात्यात रक्कम जमा करण्याच्या सुविधेला कुठलाही आकार पडणार नाही. त्यासंबंधी चार्जेस द्यावे लागणार नाहीत. या नियमांत कुठलाही बदल करण्यात आला नाही. मात्र बेसिक सेव्हिंग अकाऊंटच्या व्यतिरिक्त अन्यप्रकारचे बचत खाते असल्यास अथवा चालू खाते असल्यास अशा व्यवहारांवर प्रति महिना 25 हजार रुपयांपर्यंत कुठलीही शुल्क आकारणी नाही. त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहाराला 0.50 टक्के वा कमीत-कमी 25 रुपेय प्रति व्यवहार शुल्क मोजावे लागेल. बेसिक अकाऊंट ऐवजी अन्य बचत खाते वा चालू खात्यात प्रति महिना 10 हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार मोफत होतील. त्यानंतरच्या रक्कमेवरील व्यवहाराला 0.50 अथवा कमीतकमी 25 रुपयांपर्यंत शुल्क आकारणी करण्यात येणार आहे.