नागरिकांनो काळजी घ्या, बारामतीत कोरोनाची आजही हाफ सेन्च्युरी 50 …
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 5057 वर गेली आहे
नागरिकांनो काळजी घ्या, बारामतीत कोरोनाची आजही हाफ सेन्च्युरी 50 …
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 5057 वर गेली आहे
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (01/12/20) एकूण rt-pcr नमुने 158. एकूण पॉझिटिव्ह-26 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -25 त्यापैकी पॉझिटिव्ह -11. कालचे एकूण एंटीजन 85 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-13 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 26+11+13=50. शहर-24 . ग्रामीण- 26. एकूण रूग्णसंख्या-5057 एकूण बरे झालेले रुग्ण- 4526 एकूण मृत्यू– 129.
काल झालेल्या शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये शारदानगर येथील 49 वर्षीय महिला, कऱ्हावागज येथील 53 वर्षे पुरुष, कल्याणीनगर येथील 49 वर्षीय पुरुष, बयाजीनगर येथील 44 वर्षीय पुरुष, निरावागज येथील 38 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 49 वर्षे पुरुष, कचेरी रोड येथील 34 वर्षीय महिला, मेडिकल कॉलेज येथील 28 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
काल झालेल्या शासकीय रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये संभाजीनगर येथील 65 वर्षीय महिला, सोमेश्वरनगर येथील 32 वर्षीय पुरुष, बारामती शहरातील 46 वर्षीय पुरुष, प्रगती नगर येथील 73 वर्षीय पुरुष, सोमेश्वरनगर येथील 21 वर्षीय पुरुष, कऱ्हावागज येथील 48 वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथील 40 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये शारदानगर येथील 65 वर्षीय महिला, मोरगाव येथील 54 वर्षीय महिला, हॉटेल स्वीट शेजारील जळोची येथील 25 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
काल पवार लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅट तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये ग्रीन पार्क सोसायटी येथील 24 वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील 55 वर्षीय पुरुष, गुणवडी येथील 55 वर्षीय महिला, डोर्लेवाडी येथील 40 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.