कोरोंना विशेष

नागरिकांनो सावधान रुग्णसंख्या वाढू लागली, काल दिवसभरात एकुण 27 जण कोरोनाच्या विळख्यात

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4447 वर गेली आहे.

नागरिकांनो सावधान रुग्णसंख्या वाढू लागली, काल दिवसभरात एकुण 27 जण कोरोनाच्या विळख्यात

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4447 वर गेली आहे.

बारामती वार्तापत्र

कालचे शासकीय (15/11/20) एकूण rt-pcr नमुने 30. एकूण पॉझिटिव्ह-03 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -04 त्यापैकी पॉझिटिव्ह -02. कालचे एकूण एंटीजन 55 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-22 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 03+02+22=27. शहर-11 . ग्रामीण- 16. एकूण रूग्णसंख्या-4447 एकूण बरे झालेले रुग्ण- 4184 एकूण मृत्यू– 121.

बारामतीत काल झालेल्या शासकीय आरटीपीसीआर तपासणीमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सोनगाव 65 वर्षीय पुरुष व माळेगाव येथील 33 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

काल बारामती तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये तांदूळवाडी येथील 29 वर्षीय महिला रुई येथील 32 वर्षीय पुरुष तांदूळवाडी येथील 34 वर्षीय पुरुष कसबा येथील 43 वर्षीय पुरुष सोनगाव येथील सात वर्षीय मुलगा 60 वर्षीय महिला 30 वर्षीय महिला दशरथ नगर येथील 35 वर्षीय पुरुष सूर्यनगरी येथील एकवीस वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.

काल बारामतीतील मंगल लॅबरोटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये मेखळी येथील 56 वर्षीय पुरुष, अंजनगाव येथील 70 वर्षीय पुरुष, वडगाव निंबाळकर येथील 45 वर्षीय महिला, माळेगाव येथील 65 वर्षीय महिला, तावरे बंगला येथील 44 वर्षीय पुरुष, गुणवडी येथील 50 वर्षीय महिला, 34 वर्षीय पुरुष, मोरगाव येथील 70 वर्षीय पुरुष रूग्णाचा समावेश आहे.

बारामती शहरातील कॉलनी येथील 40 वर्षीय पुरुष, अवचट इस्टेट येथील 55 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय महिला, पाटस रोड येथील 62 वर्षीय पुरुष रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत

बारामतीत काल मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या आरटीपीसीआर तपासणीमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये वडगाव निंबाळकर येथील 54 वर्षीय पुरुष रुग्ण कोरोना बाधित आढळून आला आहे.

सर्व बारामतीकरांना आवाहन करण्यात येते की आपण सर्वांनी दिवाळीच्या मंगल समयी मास्क व सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टंसिंग पाळून कोरोना मुक्त दिवाळी साजरी करूया व आरोग्य रुपी धनाचे जतन करूया

Related Articles

Back to top button