कोरोंना विशेष

नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे,उद्याने, जलतरण तलाव लवकरच शंभर टक्के आसन क्षमतेने सुरू होणार?

पन्नास टक्के आसनक्षमतेची सक्ती कायम असल्याने मनोरंजन क्षेत्रामध्ये नाराजी आहे.

नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे,उद्याने, जलतरण तलाव लवकरच शंभर टक्के आसन क्षमतेने सुरू होणार?

पन्नास टक्के आसनक्षमतेची सक्ती कायम असल्याने मनोरंजन क्षेत्रामध्ये नाराजी आहे.

प्रतिनिधी

नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे,उद्याने, जलतरण तलाव लवकरच शंभर टक्के आसन क्षमतेने सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एक मार्चपासून थिएटर पूर्ण क्षमतेने सुरू होण्याचा विश्वास थिएटर व्यावसायिकांना वाटत आहे. सरकारने निर्णय घेतल्यास मार्च २०२० नंतर राज्यात पहिल्यांदाच थिएटर शंभर टक्के क्षमतेने सुरू होतील.

देशातील अनेक राज्यांमध्ये; तसेच विशेषत: दक्षिणेकडील राज्यांमध्ये चित्रपटगृहे शंभर टक्के क्षमतेने सुरू आहेत. देशाचे चित्रपट केंद्र असलेल्या महाराष्ट्रात निर्बंधांमुळे चित्रपटांचे प्रदर्शन निर्मात्यांना पुढे ढकलावे लागत आहे. सर्व व्यवहार पूर्ण क्षमतेने सुरू असताना केवळ नाट्यगृहे, चित्रपटगृहे, उद्याने, जलतरण तलाव पन्नास टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यामागे तर्क काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

राज्यात महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर नाट्यगृह, सभागृह आणि मोकळ्या जागेत राजकीय पक्षांचे मेळावे गर्दीत होऊ लागल्याने एकीकडे उपस्थितीच्या नियमाला हरताळ फासला जात असताना त्याच वेळी नाटक आणि चित्रपटांना पन्नास टक्के आसनक्षमतेची सक्ती कायम असल्याने मनोरंजन क्षेत्रामध्ये नाराजी आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरला पन्नास टक्के आसन क्षमतेने सुरू झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील थिएटर पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची घोषणा केली. मात्र, करोनारुग्ण वाढू लागल्यामुळे सरकारने हा निर्णय रद्द करून थिएटर पन्नास टक्के आसनक्षमतेनुसारच सुरू ठेवली.

देशातील व्यवहार पूर्ण क्षमतेने सुरू असताना; तसेच अनेक राज्यांमधील चित्रपटगृहे शंभर टक्के क्षमतेने सुरू असताना केवळ महाराष्ट्रातच निर्बंध का, हे समजत नाही. सरकारने चित्रपटगृहे शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी द्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button