स्थानिक

नातू फौंडेशन आणि डिमेक कडुन महिला हाॅस्पिटल ला मिळालेल्या अँब्युलन्स चे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांच्याकडून लोकार्पण…

उपमुख्यमंत्री ; अजित दादांनी नातू फांऊडेशन चे आभार मानले.

नातू फौंडेशन आणि डिमेक कडुन महिला हाॅस्पिटल ला मिळालेल्या अँब्युलन्स चे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांच्याकडून लोकार्पण…

उपमुख्यमंत्री ; अजित दादांनी नातू फांऊडेशन चे आभार मानले.

बारामती वार्तापत्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नातू फांऊडेशन, पुणे व डेक्कन मेकॅनिकल आणि केमिकल कंपनी (डिमेक) एमआयडीसी, बारामती यांच्या सौजन्याने देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. तसेच राज्य उत्पादन शुल्क, दौंड विभाग यांच्या कार्यालयातील नविन वाहनांचे उद्घाटन देखील यावेळी करण्यात आले. यावेळी राज्य उत्पादक शुल्क विभागाचे अधिक्षक संतोष झगडे व राज्य उत्पादक शुल्क दौंडचे निरिक्षक विजय मनाळे व नातू फांऊडेशनच्या प्रभा नातू व ‘डिमेके’चे नागेश कोरे उपस्थित होते.

याप्रसंगी प्रांतसाहेब दादासाहेब कांबळे ,एम आय डी सी उप अभियंता शुभम पाटील , डॉ.सदानंद काळे, डॉ .भोई, डिमेक कंपनीचे वरिष्ठ महाप्रबंधक श्री युवराज काळे, उप महाप्रबंधक श्री निलेश आंदळकर , श्री संभाजी नाना होळकर, उद्योजक श्री सचिन सातव , बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज चे अध्यक्ष श्री प्रमोद काकडे, कार्याध्यक्ष श्री दत्ता कुंभार.सदरच्या या स्तुत्य उपक्रमा बद्दल डिमेक नातू फौंडेशन व डिमेक कंपनीच्या चेअरमन माननीय प्रभा नातू व डिमेक कंपनी उपाध्यक्ष श्री नागेश कोरे यांचे आदरणीय अजित दादांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button