नाथाची वाडी येथील माटोबा तलावाचे जलपुजन
पंचक्रोशीतील गावांना पाणीपुरवठा करणारा तलाव पूर्णक्षमतेने भरल्याने शेतकरी व ग्रामस्थ यामध्ये आनंदाचे वातावरण

नाथाची वाडी येथील माटोबा तलावाचे जलपुजन
पंचक्रोशीतील गावांना पाणीपुरवठा करणारा तलाव पूर्णक्षमतेने भरल्याने शेतकरी व ग्रामस्थ यामध्ये आनंदाचे वातावरण
यवत:बारामती वार्तापत्र
दौंड तालुक्यातील नाथाची वाडी येथील माटोबा तलाव या तलावातून जवळपास पंचक्रोशीतील १० गावांना पाणीपुरवठा केला जातो. या १०० टक्के भरलेल्या माटोबा तलावाचे जलपूजन आमदार राहुल कुल यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार राहुल कुल म्हणाले की,
मागील काही दिवसांत झालेला पाऊस व धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे नाथाचीवाडी येथील माटोबा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने परीसरातील ग्रामस्थ व शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या तलावातून नाथाचीवाडी, देलवडी, खुटबाव, गलांडवाडी ,पारगाव ,राहू, यवत, दापोडी, पिंपळगाव आदी गावांना पिण्याचे पाणी पुरवले जाते. शिवाय परिसरातील शेकडो एकर जमीन या पाण्यावरती भिजवली जाते. व हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे शेतकरी व गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. तसेच चालू वर्षी धरण शंभर टक्के भरल्याने समाधानाचे वातावरण आहे.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे, भीमा पाटसचे संचालक विकास शेलार, माजी सरपंच संजय इनामके, विठ्ठल थोरात, उपसरपंच वैभव नातू, नरेंद्र काटे, बापूराव शेलार, अनिल वांझरे, यशवंत वाघोले, दत्तात्रय शेलार यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.