इंदापूर

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार

विद्यार्थ्यांचे केले तोंड भरून कौतुक

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार

विद्यार्थ्यांचे केले तोंड भरून कौतुक

इंदापूर : प्रतिनिधी

स्पर्धा परिक्षा व शैक्षणिक परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवणा-या गुणवंतांचा गुरुवारी तालुका व शहर भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनमध्ये महासभेचे तालुकाध्यक्ष प्रा.डॉ. जीवन सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार करण्यात आला.मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन झाल्यानंतर नगरसेविका राजश्री मखरे यांनी दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होवून वननिरीक्षक या पदावर नियुक्त झालेले प्रमोद कांबळे,वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करणा-या डाॅ.समता सरवदे, नवोदय उत्तीर्ण कु.संबोधी मोरे, धम्मान्वय चंदनशिवे,राघवेंद्र गायकवाड,चंद्रपुर सैनिक स्कूल परीक्षा उत्तीर्ण सिद्धार्थ वाघमारे, पी.ई.टी.एक्झाम उत्तीर्ण प्रा. सुहास मखरे,वकीलीचा अभ्यासक्रम पूर्ण करणारे ॲड.सुरज मखरे व दहावी बारावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवणा-या विद्यार्थ्यांचा या वेळी सन्मान करण्यात आला.

पुणे जिल्हा आरपीआय संघटक सचिव शिवाजी मखरे,भारतीय बौद्ध महासभेच्या तालुका शाखेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख बाळासाहेब सरवदे,तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे,प्रा.अशोक मखरे,भारतीय बौद्ध महासभा माजी तालुकाध्यक्ष विलास मखरे,माजी प्राचार्य शहाजी मिसाळ,शिवाजी कांबळे,कोषाध्यक्ष हनुमंत कांबळे, सरचिटणीस प्रा.श्रीनिवास शिंदे, कार्यालयीन सचिव तात्यासाहेब मसलखांब,प्रा.डी.के.भोसले, प्रा.तानाजी कसबे,प्रा.राजेंद्र गायकवाड,प्रा.विद्या गायकवाड, मनिषा मखरे,स्मिता मोरे वाघमारे, विनायक वाघमारे,भिमराव चंदनशिवे,सुनिल मखरे,रवि चव्हाण,वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अविनाश मखरे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर मखरे यांनी केले.सुत्रसंचालन सुहास मोरे यांनी केले.

Related Articles

Back to top button