आपला जिल्हा

निमगाव केतकी–शेळगाव जि.प.गटात सौ.सोनाली तुषार जाधव यांची प्रचारात आघाडी

प्रमुख नेत्यांचा पाठिंबा व महिलांचा सक्रिय सहभाग ठरत आहे ताकद

निमगाव केतकी–शेळगाव जि.प.गटात सौ.सोनाली तुषार जाधव यांची प्रचारात आघाडी

प्रमुख नेत्यांचा पाठिंबा व महिलांचा सक्रिय सहभाग ठरत आहे ताकद

आदित्य बोराटे

इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी – शेळगाव जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सौ.सोनाली तुषार जाधव यांची निवडणूक प्रचारात स्पष्ट आघाडी दिसून येत असून त्यांना जनतेतून मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जाधव यांनी आतापर्यंत तीन ते चार वेळा संपूर्ण गटात घर-टू-घर प्रचार फेरी पूर्ण केली असून प्रत्येक घरापर्यंत जाऊन थेट नागरिकांशी संवाद साधण्यावर त्यांनी भर दिला आहे. या सातत्यपूर्ण जनसंपर्कामुळे मतदारांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नेहमी ग्रामस्थांच्या अडीअडचणींमध्ये धावून जाणारे, नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे नेतृत्व म्हणून सौ.सोनाली तुषार जाधव यांची ओळख आहे. त्या उच्च शिक्षित असून शिक्षणाच्या बळावर विकासाकडे शास्त्रीय आणि दूरदृष्टीने पाहणारे नेतृत्व म्हणून त्यांची प्रतिमा आहे. परिसराच्या सर्वांगीण विकासाचा स्पष्ट आराखडा मनात ठेवून ते गेल्या अनेक वर्षांपासून समाजकारण आणि राजकारणात सक्रिय आहेत.

शिक्षण, रस्ते, पाणीपुरवठा, सामाजिक सुविधा तसेच विविध विकासाभिमुख कामे त्यांनी प्रभावीपणे राबविली आहेत. त्यांच्या कामांची थेट अनुभूती नागरिकांनी घेतल्यामुळे आजही जनतेमध्ये त्यांच्याविषयी विश्वास आणि आपुलकी कायम आहे.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्रमुख नेते राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील एकत्र आल्याने संपूर्ण गटात निवडणुकीचे वातावरण अधिक सकारात्मक झाले आहे. या दोन्ही नेत्यांच्या एकत्र येण्यामुळे संघटनात्मक ताकद वाढली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. तसेच पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांची साथ लाभल्याने सौ.सोनाली तुषार जाधव यांची राजकीय ताकद अधिक भक्कम झाल्याचे चित्र आहे.

दरम्यान, प्रचारात महिलांचा सहभागही लक्षवेधी ठरत आहे.जाधव यांच्या प्रचारार्थ त्यांचे पती तुषार जाधव हे सक्रियपणे घर-टू-घर प्रचार करत असून नागरिक व महिलांपर्यंत मोठ्या प्रमाणावर पोहोचत आहेत. ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या प्रश्नांवर संवाद साधत त्या महिला मतदारांचा विश्वास संपादन करत असल्याने महिला वर्गात सौ.सोनाली तुषार जाधव यांच्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

लोकांच्या विश्वासास पात्र ठरलेले नेतृत्व म्हणून सौ.सोनाली तुषार जाधव यांनी उमेदवारी दाखल केली असून घर-टू-घर प्रचारातील आघाडी, उच्च शिक्षणाची पार्श्वभूमी, विकासकामांचा अनुभव, प्रमुख नेत्यांचा पाठिंबा आणि महिलांचा सक्रिय सहभाग यामुळे निमगाव केतकी – शेळगाव गटात त्यांना मोठे मताधिक्य मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Back to top button