आपला जिल्हा

निमगाव केतकी -शेळगाव जि.प.आणि पं.स.गणात जाधव व भोंग यांची प्रचारात आघाडी 

प्रमुख नेत्यांचा पाठिंबा ठरत आहे ताकद 

निमगाव केतकी -शेळगाव जि.प.आणि पं.स.गणात जाधव व भोंग यांची प्रचारात आघाडी 

प्रमुख नेत्यांचा पाठिंबा ठरत आहे ताकद

आदित्य बोराटे 

निमगाव केतकी पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार रणजित भोंग यांना पंचायत समिती निर्वाचन गणातील गावा गावातील वाड्या वस्त्यांमध्ये  निवडणूक प्रचारादरम्यान मतदारंचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याचे चित्र आहे. मतदारांचा वाढता प्रतिसाद पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विजयाचा मार्ग पूर्ण पणे सुकर झाला आहे. असा ठाम विश्वास पंचायत समितीचे उमेदवार रणजित भोंग यांनी व्यक्त केला आहे.“जनतेचा कौल स्पष्ट असून, विकासाच्या मु्दयावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुढे आहे, असा ठाम दावा त्यांनी केला.

इंदापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार व राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी निमगाव केतकी तसेच संपूर्ण तालुकाभर भरीव आणि लोकाभिमुख विकासकामें करून ग्रामीण भागाचा कायापालट केला आहे. रस्ते,पाणी पुरवठा, वीज, शिक्षण, आरोग्य व विविध मूलभूत सुविधांच्या माध्यमातून सरकारच्या योजना गावागावातील नागरिकां पर्यंत प्रभाविपणे पोहोचवण्यात तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यशस्वी ठरले आहेत. हाच विकास आज प्रचाराचा मोठा विषय ठरत असल्या्चे चिन्न आहे.विरोधकांकडे सांगणयासारखे काहीच उरलेले नाही. विकासाची कामे बोलकी आहेत.

इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी शेळगाव जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण हा राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचा मानला जातो. अशा या जिल्हा परिषद गटात व त्यामध्ये गणात राष्ट्वादी कॉग्रेस पार्टीच्या उमेदवारा विरोधात भारतीय जनता पार्टी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) , त्याचप्रमाणे अपक्ष उमेदवार आहेत.

अतिशय संवेदनशील अशा महत्त्वाच्या पंचायत सामिती गणात रणजित भोंग यांनी निवडणूक प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. त्याचा प्रत्यय हा निवडणुक प्रचारादरम्यान पाहायला मिळत आहे. मितभाषी स्बभाव असलेले पण तितकेच करारी बाणा व्यक्कतीमत्व असलेल्या कर्तव्यदक्ष अशा रणजित भोंग यांना गावागावांतील समस्यांची चांगलीच जाण आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या करिश्म्याने सर्वाना आापलेसे केले आहे.

निवडणुक प्रचारात कृषी उत्पन्न समितीचे सभापती तुषार जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य देवराज जाधव, पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश जाधव, निमगाव केतकी चे माजी सरपंच व सुवर्णयुग पतसंस्थेचे चेअरमन दशरथ डोंगरे, निमगाव केतकीचे सरपंच प्रवीण डोंगरे, मा.उपसरपंच तात्यासाहेब वडापुरे, सचिन चांदणे, ग्रामपंचायत सदस्य संतोष जगताप, अमोल मिसाळ, तंटामुक्ती अध्यक्ष अतुल मिसाळ, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ व महिला सामिल झाले आहेत. त्यामुळे निवड़णूक प्रचारा दरम्यान पंचायत समिती गणातील गाव व वाड्या वस्त्यांवर प्रतिसाद मिळत आहे.

Back to top button