निराधारांना जेवण देणे म्हणजे खुप पुण्ण्याचे काम आहे-आमदार रोहीत दादा पवार
सर्व स्तरातून बोरा कुटुंबीयांचे व देसाई इस्टेट मधील विशाल जाधव मित्रपरिवाराचे कौतुक होत आहे

निराधारांना जेवण देणे म्हणजे खुप पुण्ण्याचे काम आहे-आमदार रोहीत दादा पवार
सर्व स्तरातून बोरा कुटुंबीयांचे व देसाई इस्टेट मधील विशाल जाधव मित्रपरिवाराचे कौतुक होत आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात अद्ययावत उत्तम सोयीसुविधा उपलब्ध होत असल्याने बारामती शहराच्या ग्रामीण भागातून व इतर तालुक्यातून बारामती शहरांतील दवाखान्यांमध्ये रुग्ण संख्येत वाढ होत आहे. याच कालखंडात कडकडीत लॉक डाऊन असल्याने रुग्णांची जेवणाची गैरसोय होत आहे हे लक्षात आले.
बारामती शहरातील देसाई इस्टेट मधील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बारामती शहराचे कार्याध्यक्ष मा.विशाल पोपटराव जाधव व मित्र परिवारातील तरुण युवक तसेच प्रवीणशेठ बोरा त्यांच्या पत्नी सपना बोरा आई सुशीला बोरा भाऊ महावीर बोरा त्यांची पत्नी बोरा यांनी रुग्णांना मोफत जेवण पुरविण्याचे ठरविले. रोज २५० ते ४०० रुग्णांना तसेच ज्या नातेवाईकांची जेवणाची गैरसोय आहे अश्या नातेवाईकांना ते विनामूल्य जेवण पुरवत आहेत आज आमदार श्री रोहीत दादा पवार यांच्या हस्ते लोकांना जेवण देण्यात आले प्रवीणशेठ बोरा यांच्या आई सुशीला बोरा यांचे वय ८० वर्षे असून सुद्धा त्या सकाळी लवकर उठून जेवण बनविण्यात मदत करतात सोबत सौ भावना बोरा,सौ सपना बोरा या सुध्दा जेवण बनवताना खुप कष्ट घेत आहेत.
अजूनही माणुसकी शिल्लक आहे, मानवता अजूनही शिल्लक आहे याचे उत्तम उदाहरण आपणास देसाई इस्टेट मधील या बोरा कुटुंबीय व तरुण युवकांकडून पहावयास मिळेल.
तरुण सर्व पुढे येत आहेत ही चांगली गोष्ट आहे असे ते म्हणाले. ते म्हणाले निस्वार्थी सेवा करणाऱ्या लोकांची आज समाजाला गरज आहे. स्वतः जेवण तयार करून ज्यांना खरी गरज आहे त्यांना पोहचविले जाते त्यातच खरे पुण्य व माणुसकी आहे. त्यांनी या पुण्याच्या कामास खूप खूप शुभेच्छा दिल्या. अनेक दानशूर व्यक्ती समोर येऊन मदत करत आहेत.
या मध्ये बोरा कुटुंबाचे व मित्रपरिवारातील सचिन मोरे मंगेश गिरमे,दत्तात्रय जाधव सागर मोहिते, हर्ष बोरा, सुरेश झगडे सत्यजित काटकर,मंगेश खांडेकर,कुंदन आवळे,शाम शेवाळे, ओंकार लाळगे निशांत शेंडगे,देवेश बोरा,स्वप्निल दिवटे, हिमांशू गालिंदे,नेहाल दमोदरे राहुल वर्मा इत्यादी सर्व यासाठी कष्ट घेत आहेत, …….