‘निराधारां’साठी शासनाच्या विविध योजना-भाग 2
पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी योजनेतून 700 रुपये व इंदिरा गांधी योजनेतून 300रुपये असे एकुण 1 हजार रुपये प्रतिमाह निविृत्ती वेतन अनुज्ञेय आहे.
‘निराधारां’साठी शासनाच्या विविध योजना-भाग2
पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी योजनेतून 700 रुपये व इंदिरा गांधी योजनेतून 300रुपये असे एकुण 1 हजार रुपये प्रतिमाह निविृत्ती वेतन अनुज्ञेय आहे.
बारामती वार्तापत्र
निराधार व्यक्तींसाठी असणाऱ्या योजनेच्या माध्यमातून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. विशेषत: दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी या योजना आधार ठरल्या आहेत.
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या 40 ते 79 वर्षाखालील वयोगटातील विधवा या योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र असतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी वयाबाबतचा पुरावा, शिधापत्रिका व आधारकार्डची झेरॉक्स, नगरपंचायत/नगरपालिका/ ग्रामसेवक यांच्याकडील दारिद्र्य रेषेखालील दाखला, मंडल अधिकारी व तलाठी अहवाल व जबाब इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असते.
पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी योजनेतून 700 रुपये व इंदिरा गांधी योजनेतून 300रुपये असे एकुण 1 हजार रुपये प्रतिमाह निविृत्ती वेतन अनुज्ञेय आहे.
इंदिरा गांधी अपंग राष्ट्रीय निवृत्त्ती वेतन योजना
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 18 ते 79 वयोगटातील 80 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्ती या योजनेमध्ये निवृत्तीवेतनास पात्र ठरतात. पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेतून 700 रुपये इंदिरा गांधी योजनेतून 300 रुपये असे एकूण 1 हजार प्रतिमाह निवृत्तीवेतन अनुज्ञेय आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी वयाबाबतचा पुरावा, शिधापत्रिका, निवडणूक ओळखपत्र व आधारकार्डची झेरॉक्स, नगरपंचायत/नगरपालिका/ग्रामसेवक यांच्याकडील दारिद्र्य रेषेखालील दाखला, 80 टक्के पेक्षा जास्त अपंगत्व असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रमाणपत्र, मंडल अधिकारी व तलाठी अहवाल व जबाब इत्यादी कागदपत्रांची आवश्यकत असते.
इंदिरा गांधी वृध्दापकाळ राष्ट्रीय निवृत्त्ती वेतन योजना
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 65 वयावरील व्यक्ती या योजनेमध्ये निवृत्तीवेतनास पात्र आहेत. पात्र लाभार्थ्यांना श्रावणबाळ योजनेतून 800 रुपये व इंदिरा गांधी योजनेतून 200 रुपये, असे एकूण 1 हजार प्रतिमाह निवृत्तीवेतन अनुज्ञेय ठरते. योजनेचा लाभ घेण्यासाठी वयाबाबतचा पुरावा, शिधापत्रिका, निवडणूक ओळखपत्र व आधारकार्डची झेरॉक्स, नगरपंचायत/ नगरपालिका/ग्रामसेवक यांच्याकडील दारिद्र्यरेषेखालील दाखला, मंडल अधिकारी व तलाठी अहवाल व जबाब इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असते.
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
दारिद्र्य रेषेखालील 18 ते 59 वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा (पुरुष अथवा स्त्री) अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियास एक रकमी 20 हजार रुपयाचे अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत देण्यात येते. मयत व्यक्तीचा जन्माचा व मृत्यूचा दाखला, निवडणूक ओळखपत्र शिधापत्रिका आधारकार्डची छायांकित प्रत, नगरपंचायत/नगरपालिका/ ग्रामसेवक यांच्याकडील दारिद्ररेषेखालील दाखला, घरातील मयत व्यक्ती कमवती असलेबाबत तलाठी दाखला, तलाठी स्थानिक अहवाल व वारसाचे दाखले इत्यादी कागदपत्रांसह अर्ज करणे आवश्यक आहे.
या सर्व योजना स्थानिक पातळीवर महसूली यंत्रणेमार्फत राबविण्यात येतात. गरजू नागरिकांनी तहसीलदार किंवा गावातील तलाठी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा व या योजनांचा लाभ घ्यावा.
विजय पाटील, तहसिलदार बारामती- गेल्या दोन वर्षात बारामती तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेची 1121, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची 53, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेची 52, इंदिरा गांधी वृध्दपकाळ निवृत्त्ती वेतन योजनेची 34 व श्रावणबाळ योजनेअंतर्गत 603 इतक्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या वारसांच्या कुटुंबीयांना सामाजिक अर्थसहाय्य म्हणून संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 43 व राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत 3 असे मिळून एकूण 46 कुटुंबीयांना लाभ देण्यात आला आहे. -उप माहिती कार्यालय, बारामती.