आपला जिल्हा

निरा-भिमा कारखान्यावरती सोमवारी ऊस पिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान परिसंवाद

शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

निरा-भिमा कारखान्यावरती सोमवारी ऊस पिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान परिसंवाद 

शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

इंदापूर, आदित्य बोराटे –

शहाजीनगर (ता. इंदापूर ) येथील निरा-भिमा सहकारी साखर कारखान्यावरती ऊस पिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (A. I.) या विषयावरती परिसंवादाचे आयोजन सोमवारी (दि. 27) दुपारी 1.30 वा. करण्यात आले आहे, अशी माहीती कारखान्याच्या अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील व उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे यांनी शुक्रवारी दिली.

शहाजीनगर येथील भाग्यरत्न सांस्कृतिक भवन येथे हा ऊस पीक परिसवांद होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे संस्थापक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित राहणार आहेत. या परिसंवादामध्ये बदलत्या काळानुसार ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, उत्पादकता वाढ, साखर उतारा सुधारणा, मृदा व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग आदी संदर्भात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. डी. कडलग व विज्ञान विज्ञान केंद्र बारामतीचे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान विभाग प्रमुख तुषार जाधव हे मार्गदर्शन करणार आहेत.

निरा भिमा कारखाना कार्यक्षेत्रात गेल्या ऊस पिक हंगामापासून ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (A. I.) चा वापर सुरू करण्यात आला आहे. सदरची ऊस पिके अतिशय जोरदार आली असून, हे तंत्रज्ञान ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरत आहे. निरा भीमाच्या कार्यक्षेत्रात या तंत्रज्ञानाचा वापर ऊस शेतीमध्ये वाढीसाठी कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील हे प्रयत्नशील आहेत. आगामी काळामध्ये ऊस शेतीमध्ये या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे क्रांती घडणार आहे. तरी या ऊस परिसंवादाचा लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन कारखान्याच्या अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील, उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ यांनी केले आहे.

 

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/1-KfcqwqNS4?si=eKzwwEh9BhlZX-a_