‘निर्भय कन्या अभियान’ कार्यशाळा उत्साहात
कार्यशाळेमुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, स्वसंरक्षण कौशल्य व सक्षमीकरणाची जागरूकता वाढली.

‘निर्भय कन्या अभियान’ कार्यशाळा उत्साहात
कार्यशाळेमुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, स्वसंरक्षण कौशल्य व सक्षमीकरणाची जागरूकता वाढली.
बारामती वार्तापत्र
विद्या प्रतिष्ठान शिक्षणशास्त्र महाविद्यालयात ‘निर्भय कन्या अभियान’ अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली.
उद्घाटन अॅड. स्नेहल भापकर व प्राचार्या डॉ. संगिता गायकवाड यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सौ. वैशाली सातपुते यांनी करून अभियानाची उद्दिष्टे स्पष्ट केली. पहिल्या सत्रात अॅड. स्नेहल भापकर यांनी ‘स्त्रियांचे कायदे व संरक्षण’ या विषयावर मार्गदर्शन करत महिलांसाठीचे विविध कायदे व त्यांचा योग्य वापर याविषयी माहिती दिली.
दुसऱ्या सत्रात श्री. बाळासाहेब नगरे (विभाग प्रमुख, शारदा महिला संघ) यांनी ‘उद्यमशीलता : महिला सक्षमीकरण’ या विषयावर मार्गदर्शन करून बचत गट, उद्योजकता व आर्थिक स्वावलंबन यावर भर दिला.
तिसऱ्या सत्रात श्री. साहेबराव ओहोळ (संचालक, योद्धा स्पोर्ट्स अकॅडेमी) यांनी ‘स्वसंरक्षण कराटे प्रशिक्षण’ या विषयावर मार्गदर्शन करत विविध सेल्फ-डिफेन्स तंत्रांचे प्रात्यक्षिक दाखवले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण प्राचार्या डॉ. संगिता गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. दीपमाला वाघमारे व प्रा. गीता जोशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. वैशाली खोमणे यांनी केले.
या कार्यशाळेमुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, स्वसंरक्षण कौशल्य व सक्षमीकरणाची जागरूकता वाढली.






