निलंबनाच्या भीतीने विष प्राशन केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू
मृत्यूशी 24 तासाच्या त्यांची झुंज अपयशी ठरली
निलंबनाच्या भीतीने विष प्राशन केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू
मृत्यूशी 24 तासाच्या त्यांची झुंज अपयशी ठरली
प्रतिनिधी
एसटी कर्मचारी टोकाचं पाऊल उचलत आपलेही निलंबन होईल या भीतीने संपकरी एसटी कर्मचारी विशाल अंबलकर यांनी विष प्राशन केले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आगारातील सहाय्यक तांत्रिक पदावर विशाल अंबलकर हे कार्यरत होते.
विशाल अंबलकर यांनी निलंबनाच्या भीतीने विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मृत्यूशी 24 तासाच्या त्यांची झुंज अपयशी ठरली. त्यांच्या मृत्यूनंतर सरकार ‘अजून किती बळी घेणार ?’ असा संतप्त सवाल आता विचारला जातोय.
गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू अनेक एसटी कर्मचारी टोकाचं पाऊल उचलत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील माटरगाव येथील रहिवासी विशाल अंबलकार यांनी सुद्धा निलंबनाच्या भीतीपोटी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. काल त्यांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यानंतर प्रकृती बिघडल्यामुळे अकोला येथे रेफर करण्यात आलं होतं. मात्र अकोल्यात उपचारा दरम्यान या एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.