स्थानिक

निवडणुकीची तयारी सुरू, प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर;बारामती, शिरूरसह बारा नगरपालिकांचा समावेश

एप्रिलमध्ये तारखा जाहीर होण्याची शक्यता!

निवडणुकीची तयारी सुरू, प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर;बारामती, शिरूरसह बारा नगरपालिकांचा समावेश

एप्रिलमध्ये तारखा जाहीर होण्याची शक्यता!

बारामती वार्तापत्र

राज्य निवडणूक आयोगाने आगामी नगरपालिकांच्या निवडणुकांची प्रभागरचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने निवडणुकीची तयारी आणि चर्चा सुरू झाल्याचे चित्र आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभाग रचना करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविण्याचा जो कार्यक्रम मंगळवारी जाहीर केला तो लक्षात घेता एप्रिलच्या दुसऱ्या वा तिसऱ्या आठवड्यात निवडणुकीची तारीख जाहीर होईल व निवडणूक मे मध्ये होईल, अशी शक्यता आहे.

त्यानुसार नव्या प्रभाग रचनेसाठी २०११ ची लोकसंख्या विचारात घेण्यात यावी, निवडणुक आयोगाचे निकष, सर्वोच्च व उच्च न्यायालयांचे आदेश पाळून ही रचना तयार करावी, असे आदेशात म्हटले आहे.

त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने त्यासाठी प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. बारामती, शिरूर, दौंड, लोणावळ्यासह
बरोबरच चाकण, राजगुरूनगर, जेजुरी, आळंदी, सासवड, तळेगाव दाभाडे, जुन्नर, इंदापूर या नगरपालिकेची मुदत संपत आहे.

असा असणार प्रभाग रचनेचा कार्यक्रम…
नगरपालिकांसाठी प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे २ मार्च २०२२ पर्यंत सादर करण्याचे.

निर्देश मुख्याधिकारी यांना दिले आहेत. यामध्ये प्रभागांची संख्या, तसेच प्रभागनिहाय अनुसूचित जाती, जमातीची.

लोकसंख्या, क्षेत्र, सीमांकन व नकाशा याचा समावेश आहे. जिल्हाधिकारी ७ मार्चपर्यंत प्रभागरचनेस मान्यता देणार.
आहेत. प्रारूप प्रभागरचना, प्रभागदर्शक नकाशे रहिवाशांच्या माहितीसाठी १० मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपालिकांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रभागरचनेवर १० मार्च ते १७ मार्चपर्यंत हरकती व सूचना मागविल्या जाणार आहेत.

२२ मार्च रोजी जिल्हाधिकारी हरकती व सूचनांवर सुनावणी होईल. त्यानंतर २५
मार्चपर्यंत जिल्हाधिकारी हरकती व सूचनाचा अभिप्राय देऊन राज्य निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठविणार आहेत.

नगरपालिकांच्या अंतिम प्रभागरचनेचा कार्यक्रम ५ एप्रिल २०२२ पर्यंत जाहीर होणार आहे.

नागरिकांना पाहण्यासाठीहा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच नगरपालिका कार्यालयांच्या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!