निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे इंदापूर तालुक्यात कोरोनाचा विस्फोट – हर्षवर्धन पाटील.
इंदापूरच्या प्रशासनावरती लोकप्रतिनिधींचे नियंत्रण नाही. कोरोना रुग्णांची संख्या 500 च्या पुढे
निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे इंदापूर तालुक्यात कोरोनाचा विस्फोट – हर्षवर्धन पाटील.
इंदापूरच्या प्रशासनावरती लोकप्रतिनिधींचे नियंत्रण नाही. कोरोना रुग्णांची संख्या 500 च्या पुढे
इंदापूर :-प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील प्रशासन हे पुर्णपणे निष्क्रीय व ठप्प झालेले प्रशासन असून त्यावर कोणाचेच नियंत्रण नाही.वास्तविक पाहता ही लोकप्रतिनीधीची नैतिक जबाबदारी आहे.
मी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचे आभार मानतो कि त्यांनी पदभार स्विकारताच चारच दिवसात स्वतः येऊन तालुक्यातील वस्तुस्थिती जानून घेतली. मी गेले तीन महिन्यांपासून वारंवार सांगत आहे कि यात जर लक्ष नाही घातले तर इंदापूर तालुका हा कोरोनाचा हाँटस्पाँट बनेल.आता तर माझे स्पष्ट मत आहे कि या सर्व गोष्टींना निष्क्रिय लोकप्रतिनीधी जबाबदार आहेत असा गंभीर आरोप माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे.
इंदापूर मधील डॉ.गोरे यांच्या हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी वरील मत व्यक्त केले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ प्रशासनावर कोणाचेही लक्ष नाही.औषधे उपलब्ध नाहीत.एखादा कोरोचा रुग्ण जर मृत्यूमुखी पडला तर त्याचा अंत्यविधी कसा करायचा याचा एक प्रोटोकाॅल आहे. मात्र तोही कुठे पाळला जात नाही.आज भयानक परिस्थिती या इंदापूर तालुक्यात झालेली असून जनता भयभित झाली आहे. कोणीही नागरिक या भिती व गैरसोईपोटी तपासण्या करण्यास पुढे येण्यास तयार नाहीत.जर एखादी व्यक्ती पाॅझिटीव्ह निघाली तर ती सरकारी यंत्रणेकडे जाऊन सेवा घेण्यास तयार नाही.ते म्हणतात आम्हाला खाजगी नेऊन उपचार करा.तर खाजगीत कुठेही जागा शिल्लक नाही. व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत. बारामती,अकलूज,पुणे आदी ठिकाणी रुग्णांना घेतले जात नाही. अशा स्थितीत रुग्णांनी जायचे कुठे ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.कोरोना हा केवळ एका तालुक्यापूरता मर्यादित आजार नसून तो आंतरराष्ट्रीय स्वरुपाचा गंभीर आजार आहे. यावर सरकारचे नियंत्रण आहे.आज दुर्दैवाने इंदापूर तालुक्यातील निष्क्रिय कार्किर्दीने जनता हवालदिल झाली आहे. मला कुठेही राजकारण करायचे नाही. मात्र अशीच परिस्थिती राहीली तर किती व्यक्तींचे बळी गेल्यानंतर तुम्हाला जाग येणार आहे ? असा उलट सवाल पाटील यांनी केला.या तालुक्यात एकही कोरोनाचा रुग्ण नव्हता. मात्र या निष्क्रियतेमुळे तालुक्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढायला लागली आहे. यासाठी शांत न राहता जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांना निवेदने देणार असून सरकारने किंवा स्थानिक लोकप्रतिनीधीने यात लक्ष नाही घातले तर मगं मात्र आम्हाला वेगळा मार्ग स्विकारावा लागेल असा इशारा पाटील यांनी दिला आहे.
इंदापूर तालुक्यात कोरोना रुग्णासाठी खाटांची संख्या अपुरी आहे, राज्यमंत्री भरणे गेल्या सहा महिन्यापासून देखील व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड उपलब्ध करू शकले नाहीत. तालुक्यातील कोविड केअर सेंटर मध्ये अनेक असुविधा आहेत, तिथे बायोमेट्रिक वेस्टेजचे मॅनेजमेंट योग्य होत नाही. रुग्णांची वाढती संख्या आणि प्रशासनाची हतबलता यामुळे रुग्णाचे नातेवाईक आणि प्रशासनात मोठे वाद निर्माण झाले असून जनतेपुढे कोणताच पर्याय उपलब्ध राहिला नसल्याने निष्क्रिय तालुका प्रतिनिधीमुळे तालुक्यात गंभीर परिस्थिती ओढावली आहे. नागरिकांचे प्रचंड हाल होत असून जनता भयभीत झाली आहे. इतर तालुक्यात उदघाटन करण्यापेक्षा आपल्या तालुक्यातील विदारक परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न केला असता तर ते योग्य ठरले असते.’