नीरा भीमा कारखान्याकडून ऊस गाळपाचा नवीन विक्रम प्रस्थापित ; ६ लाख ४७ हजार टन गाळप पूर्ण
कारखान्याचे ७ लाख टन गाळपाचे उद्धिष्ट
नीरा भीमा कारखान्याकडून ऊस गाळपाचा नवीन विक्रम प्रस्थापित ; ६ लाख ४७ हजार टन गाळप पूर्ण
कारखान्याचे ७ लाख टन गाळपाचे उद्धिष्ट
इंदापूर : प्रतिनिधी
शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने चालु सन २०२१-२२ च्या गळीत हंगामामध्ये गुरुवारी (दि.१७) ६ लाख ४७ हजार मे. टन ऊसाचे गाळप पुर्ण करून कारखान्याच्या इतिहासात नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. यापूर्वी कारखान्याने सन २०१४-१५ च्या हंगामात ६ लाख ४६ हजार ९८५ में. टन ऊसाचे गाळप केले होते. चालू हंगामात कारखान्याचे ७ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती अध्यक्ष लालासाहेब पवार व उपाध्यक्ष कांतिलाल झगडे यांनी दिली.
कारखान्याचा चालू २१ वा गळीत हंगाम उत्कृष्टपणे चालू असून अंतिम टप्प्यात आला आहे. कारखाने गुरुवारी स्वतःचा यापूर्वीच्या सर्व हंगामाचा ऊस गाळपाचा विक्रम मोडून नवीन विक्रम प्रस्थापित केलेबद्दल कारखान्याचे संस्थापक व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक कंत्राटदार, मुकादम, तोडणी मजूर, अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.
कारखान्याने सहवीज निर्मिती प्रकल्पातून ३ कोटी युनिट वीज एक्सपोर्ट केली आहे. तसेच इथेनॉल व इतर प्रकल्पही पुर्ण क्षमतेने उत्कृष्टपणे चालु आहेत. कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली चालू गळीत हंगामामध्ये कारखाना ७ लाख मे. टन ऊस गाळपाचे विक्रमी उद्धिष्ट पूर्ण करेल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.शेतकऱ्यांच्या सर्व ऊसाचे गाळप पूर्ण होईपर्यंत कारखाना चालू ठेवण्याच्या सूचना संस्थापक हर्षवर्धन पाटील यांनी दिल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व ऊसाचे गाळप केले जाईल, अशी माहिती याप्रसंगी अध्यक्ष लालासाहेब पवार व उपाध्यक्ष कांतिलाल झगडे यांनी दिली.
यावेळी संचालक विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील,कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, संगीता पोळ, जबीन जमादार, प्र.कार्यकारी संचालक सुधीर गेंगे-पाटील तसेच के.एस.पाटील, पी.बी.पाटील, डी.एम.लिंबोरे, ए.बी.मोहोळकर, एस.एम.घोगरे, के.एस.गायकवाड, एफ.एम.गोडसे, एम.एस मुलाणी, ए.एस.बागल, एस.ए.कदम, एस.एम.दिवटे, एस.बी.ढवळे, एम.व्ही.शिंदे, एस.जी.मोहिते, एन.टी.वांद्रे, एम.व्ही.घोरपडे, बी.व्ही.काळकुटे हे अधिकारी उपस्थित होते.