आपला जिल्हा

नीरा भीमा कारखान्याचा इथेनॉलचा पहिला टँकर रवाना

हर्षवर्धन पाटील व सौ.भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते पूजन 

नीरा भीमा कारखान्याचा इथेनॉलचा पहिला टँकर रवाना

•हर्षवर्धन पाटील व सौ.भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते पूजन

इंदापूर,प्रतिनिधी –

निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या चालु गळीत हंगामातील इथेनॉलचा पहिला टँकर ऑइल कंपन्यांच्या डेपोकडे मंगळवारी (दि. 4) रवाना करण्यात आला. याप्रसंगी पहिल्या टँकरचे पूजन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री व कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील व कारखान्याच्या अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते शहाजीनगर (ता. इंदापूर ) येथे करण्यात आले.

निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे चालू ऊस गळीत हंगामामध्ये इथेनॉल उत्पादनाचे सुमारे 1 कोटी 30 लाख लिटरचे उद्दिष्ट असल्याची माहिती याप्रसंगी कारखान्याच्या अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील यांनी दिली. तसेच कारखान्याच्या चालु गळीत हंगाम उत्कृष्टपणे सुरु झाला असून दररोज सुमारे 5500 मे. टन उसाचे गाळप केले जात आहे. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, अँड. कृष्णाजी यादव, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे, कार्यकारी संचालक एन. ए. सपकाळ, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

_______________________

फोटो:-शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील निरा भिमा कारखान्याच्या इथेनॉलच्या पहिल्या टँकरचे पूजन प्रसंगी हर्षवर्धन पाटील, सौ.भाग्यश्री पाटील व इतर.

Back to top button