इंदापूर
नीरा भीमा कारखान्यावरती कर्मयोगी शंकररावजी पाटील यांना आदरांजली.
प्रतिमेचे पूजन करून आदरांजली अर्पण करण्यात आली.
नीरा भीमा कारखान्यावरती कर्मयोगी शंकररावजी पाटील यांना आदरांजली.
प्रतिमेचे पूजन करून आदरांजली अर्पण करण्यात आली.
बारामती वार्तापत्र, इंदापुर
शहाजीनगर (ता.इंदापूर) येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्यावरती आज रविवारी (दि.13) जेष्ठ नेते, माजी संसद सदस्य, कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील व मान्यवरांनी भावपुर्ण आदरांजली अर्पण केली.
इंदापूर तालुक्याच्या जडणघडणीमध्ये भाऊंचे योगदान फार मोठे असून एक आदर्श विचार आणि समाज विकासामध्ये सहकाराच्या माध्यमातून केलेले कार्य मोठे आहे.
कर्मयोगी शंकरराव पाटील यांचा आज 14 वा स्मृती दिन आहे. याप्रसंगी कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुधीर गेंगे पाटील, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.