इंदापूर

नीरा भीमा कारखान्यास उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा द्वितीय पुरस्कार प्रदान

- मांजरी बु.येथे पुरस्कार प्रदान कार्यक्रम

नीरा भीमा कारखान्यास उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा द्वितीय पुरस्कार प्रदान

– मांजरी बु.येथे पुरस्कार प्रदान कार्यक्रम

इंदापूर : प्रतिनिधी

शहाजीनगर (ता. इंदापूर ) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्यास मांजरी बुद्रुक येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) चा गळीत हंगाम सन २०२०-२१ चा मध्य विभागातील उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार रविवारी (दि. ५) व्हीएसआयचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे व संचालक मंडळाने स्वीकारला.

मांजरी बुद्रुक येथे आयोजित राज्यस्तरीय साखर परिषदेमध्ये पुरस्कार प्रदान कार्यक्रम संपन्न झाला. तसेच यावेळी नीरा-भीमा कारखान्याचे २ ऊस उत्पादक शेतकरी आनंदराव नामदेव बोंद्रे (रा.निमसाखर) व आबासाहेब तुळशीराम घोडके (पिंपरी बु.) यांना ऊस भूषण पुरस्कार आणि कारखान्याचे पर्यावरण अधिकारी कल्याणराव गायकवाड यांना उत्कृष्ट पर्यावरण अधिकारी पुरस्कार प्रदान करण्यात आला. नीरा-भीमा कारखान्याशी संबंधित एकूण ४ पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने कारखान्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे, असे गौरवोद्गार कारखान्याचे संस्थापक व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काढले.

या पुरस्कारांबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी कारखान्याचे संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी मजूर, वाहतूकदार, मुकादम, अधिकारी, कर्मचारी,आदी सर्वांचे अभिनंदन केले. नीरा-भीमा कारखान्याला यापूर्वी राज्य व देशपातळीवरील एकूण ११ पुरस्कार मिळाले आहेत, अशी माहिती अध्यक्ष लालासाहेब पवार व उपाध्यक्ष कांतीलाल झगडे यांनी दिली. याप्रसंगी कारखान्याचे संचालक दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, मच्छिंद्र वीर, भागवत गोरे, प्र.कार्यकारी संचालक सुधीर गेंगे-पाटील व अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram