नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई द्या : सागर मिसाळ
इंदापूरच्या तहसीलदारांना दिले लेखी निवेदन..

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई द्या : सागर मिसाळ
इंदापूरच्या तहसीलदारांना दिले लेखी निवेदन..
इंदापूर;प्रतिनिधि
इंदापूर तालुक्यात अतिवृष्टी पुरामुळे तालुक्यातील शेतीपिके व फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. व ज्या नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या घरात पुराचे पाणी घुसले, त्यांना सानुग्रह अनुदान तत्काळ घ्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे, जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ यांनी इंदापूरचे तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
सागर मिसाळ म्हणाले, इंदापूर तालुक्यात फेब्रुवारी ते मे या महिन्याच्यादरम्यान, काही परिसरात काही भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके नेस्तनाबूत झाली. पुराचे पाणी अनेक गरीब कुटुंबाचे नुकसान करून गेले, याचे पंचनामेदेखील करण्यात आले.आहेत, मात्र या बाधित शेतकरी नागरिकांना, कोणतीही शासनाच्या वतीने मदत करण्यात आलेली नाही. ज्यांचे नुकसान झाले अशी कुटुंबे हदबल झाले आहेत. अशा बाधितांना सहानुग्रह अनुदान अत्यंत गरजेचे आहे. यासाठी जर विलंब लावत असाल तर, पक्षाच्या वतीने जनआंदोलन उभे केले जाईल. असाही इशारा यावेळी सागर मिसाळ यांनी दिला.
यावेळी सागर मिसाळ, छायाताई पडसळकर, ॲड.इनियातजी काझी, आसमा मुलानी, संजय दुपारगुडे, अक्षय कोकाटे, सुनील घोळवे , अमोल चव्हाण,संजय सोनवणे,समीर मिसाळ आदी उपस्थित होते.
सुळे, कृषिमंत्री भरणे यांनी लक्ष घालावे
इंदापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना खासदार सुप्रिया सुळे व राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी, सूचना द्याव्यात. अशीही अपेक्षा मिसाळ यांनी व्यक्त केली आहे.