स्थानिक

पोलीस निरीक्षकांसह इतर पोलीसांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी.

इतर दोन प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी सामील असल्याचे निवेदनात नमूद.

बारामती: येथील बारामती शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील आणि त्यांच्या काही सहकारी अधिकारी, कर्मचार्‍यांची खातेनिहाय चौकशी करुन त्यांची बदली करावी, अशी मागणी कारभारी अण्णा चॅरिटेबल फाऊंडेशनचे सचिव प्रशांत उर्फ सातव यांनी केली आहे.

इतर दोन प्रकरणात उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर हेही सामील असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्याकडे लेखी स्वरूपात सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे. या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी मोहिते यांनी सोमवारी (ता 15) बोलावले असल्याची माहिती सातव यांनी दिली.

दरम्यान सातव यांनी नऊ विविध प्रकरणांचा उल्लेख पत्रामध्ये केलेला असून प्रत्येक आरोपासंदर्भात आपल्याकडे विविध कागदपत्रे आहेत. आणि ती आपण मोहिते यांना सादर करु, असे त्यांनी नमूद केले आहे. यातील काही प्रकरणात औदुंबर पाटील यांच्यासह पद्मराज गंपले, सचिन शिंदे, शेलार, पोलिस कर्मचारी पोपट नाळे यांची गैरप्रकारांबाबत चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांची बदली करावी, असे या निवेदनात नमूद केले आहे.

या संदर्भात औदुंबर पाटील यांनी प्रतिक्रीया देण्यास नकार दिला. मला वरिष्ठांकडून चौकशीसाठी बोलावण्यात आल्यास त्यांच्यापुढेच म्हणणे मांडू असे ते म्हणाले.

Related Articles

Back to top button