नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न
ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा असल्याने, ब्लड बँकेतून रक्त पुरवठा करणे अशक्य झाले आहे.
नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न
ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा असल्याने, ब्लड बँकेतून रक्त पुरवठा करणे अशक्य झाले आहे.
बारामती वार्तापत्र
नेताजी सुभाष चंद्र बोस चौक प्रतिष्ठान यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. बारामती येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित लेट, मानिकाबाई चंदुलाल सराफ ब्लड बँक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात रक्तदात्यांनी उत्फूर्तपणे रक्तदान केले.
ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा असल्याने, ब्लड बँकेतून रक्त पुरवठा करणे अशक्य झाले आहे. रक्तदान शिबिरे आयोजित करून ब्लड बँकेत रक्त संकलित केले जाते मात्र रक्तच उपलब्ध नसल्याने गरजू रुग्णांना रक्त पुरवठा करणे अशक्य झाले होते. या पार्श्वभुमीवर ब्लड ब्लड बँकेच्या विनंतीवरुन नेताजी सुभाष चंद्र बोस चौक प्रतिष्ठानच्या वतीने नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आज रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन बारामती नगरपालिकेचे गटनेते सचिन सातव यांच्या हस्ते व व्यापारी महासंघाचे स्वप्निल मुथा, रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.के.सिसोदिया यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.
नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त शहरातील नेताजी सुभाष चौक येथे प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम शहर पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी साहिल शहा, ऋतीक ओसवाल, भारत मेथा, जाकिर शेख, अक्षय सोनवणे तसेच बारामतीतील व्यापारी यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला.