नोव्हेंबरपासून नाट्यगृहे, सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स ५० टक्के क्षमतेने सुरू
मात्र नाट्यगृहं, सिनेमागृहं, मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी नसेल.
नोव्हेंबरपासून नाट्यगृहे, सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स ५० टक्के क्षमतेने सुरू
मात्र नाट्यगृहं, सिनेमागृहं, मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी नसेल.
बारामती वार्तापत्र
देशात कोरानेची रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. महाराष्ट्रातही बरीच कोविड सेंटर बंद करण्यात आली आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. गेल्या सहा महिन्यांपासून सिनेमागृहे बंद होती. आता राज्यात अनलॉक सुरु आहे. राज्य सरकारने अनलॉक संदर्भात नवी नियमावली प्रसिद्ध केली आहे. उद्या ५ नोव्हेंबरपासून नाट्यगृहे, सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.
मात्र नाट्यगृहं, सिनेमागृहं, मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी नसेल. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालून देण्यात आलेले सर्व नियम पाळणे बंधनकारक राहणार आहेत.
तसेच बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॉश या इनडोअर खेळांसह इनडोअर शूटिंग रेंज सुरू करण्यासही सरकारने परवानगी दिली आहे. कंटेन्मेंट झोनमधील जलतरण तलाव बंदच राहणार आहेत.
कोरोनाचे नियम पाळून हे सर्व सुरु करावे लागणार आहे. योगा अभ्यास केंद्रांनाही परवानगी दिली आहे.