न्याय मंदिर क्रिकेट चषक प्रेरणादायी:व्ही सी बर्डे
वकिलांच्या एकीचे आणि खेळाडू वृत्तीचे कौतुक

न्याय मंदिर क्रिकेट चषक प्रेरणादायी:व्ही सी बर्डे
वकिलांच्या एकीचे आणि खेळाडू वृत्तीचे कौतुक
बारामती वार्तापत्र
क्रिकेट क्षेत्रामध्ये बारामतीचे नाव आहे आणि वकील आणि त्यांच्या खेळातील कलागुणांना वाव भेटावा म्हणून बारामती न्याय मंदिर क्रिकेट चषक प्रेरणादायी होणार असल्याचे प्रतिपादन मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही सी बर्डे यांनी केले
बारामती न्याय मंदिर चषक २०२५ चे उद्घाटन प्रसंगी ऍड बर्डे बोलत होते.
बारामती वकील संघटनेने आयोजन केलेले राज्यस्तरीय क्रिकेट सामने यांचे शुक्रवार 21 फेब्रुवारी 2025 रोजी बारामती येथील मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.सी. बर्डे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झाले. महाराष्ट्रातील अनेक बार असोसिएशनच्या टीम या स्पर्धेमध्ये भाग घेत असतात.
यावेळी या स्पर्धा बारामती येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर दिनांक 21 ते 23 फेब्रुवारी च्या दरम्यान होत आहेत. यावर्षी या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच महिला वकिलांच्या ही दोन टीम रिंगणात उतरलेल्या आहेत.
सकाळी पीच चे पूजन करून व नारळ फोडून जिल्हा न्यायाधीश बर्डे साहेब यांनी या स्पर्धेचे उद्घाटन केले. तीन दिवस चालणार या स्पर्धांमध्ये अनेक वकिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे.
उद्घाटन प्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश वाणी साहेब तसेच वकील संघटनेचे पदाधिकारी व वकिलांच्या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष ॲड समीर शेख तसेच अनेक सीनियर व जुनियर वकील उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हा न्यायाधीश बर्डे साहेब यांनी वकिलांच्या एकीचे आणि खेळाडू वृत्तीचे कौतुक केले.
वकील संघटनेच्या सभासदांचे कार्यकारिनीचे कौतुक केले तसेच सामने सुरळीत पार पाडावे यासाठी वकील संघटनेला शुभेच्छा दिल्या.