न्हावी गावातील अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले स्वागत

न्हावी गावातील अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले स्वागत
इंदापूर : प्रतिनिधी
न्हावी गावचे युवानेते व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संतोष मारकड व न्हावी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संचालक आबासो पाटील यांनी सोमवारी (दि.२४) असंख्य कार्यकर्त्यांसह राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी बोलताना श्री.पाटील म्हणाले की,आम्ही इथून पुढे भरणे मामांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजून बळकट करणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस व पक्षश्रेष्ठी शरद पवार यांविषयी असणारे आकर्षण व दत्तात्रय भरणे यांच्या तळागाळातील सर्वांगीण विकासाच्या कार्यपद्धतीने प्रेरित होऊन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला आहे.गावच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील काळामध्ये भरणे मामांच्या मार्गदर्शनाखाली खंबीरपणे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी पंचायत समितीचे मा.उपसभापती कांतिलाल बोराटे,खरेदी-विक्री संघाचे संचालक साहेबराव चोपडे,युवा नेते दिपक डोंबाळे, सरपंच बळी बोराटे,राजु रासकर,प्रकाश रासकर,शहाजी बनसोडे,कुंडलिक गोरे,नामदेव मारकड,नवनाथ बोराटे,अनिल चोपडे,देविदास देवकाते आदी पदाधिकारी उपस्थित होते.