पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणाचे पुणे कनेक्शन;तपासात धक्कादायक खुलासे
चार राज्यातून शुटर्स पंजाबमध्ये पाठवण्यात आले होते.
पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणाचे पुणे कनेक्शन;तपासात धक्कादायक खुलासे
चार राज्यातून शुटर्स पंजाबमध्ये पाठवण्यात आले होते.
क्राईम;बारामती वार्तापत्र
पंजाबमधील सुप्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येची कबुली लॉरेन्स यांनी दिली आहे. त्यानंतर या हल्ल्याबाबत नवनवीन खुलासे होण्यास सुरुवात झाली आहे. सिद्धू मूसेवाला यांची २९ मे रोजी हत्या करण्यात आली होती. भर दिवसात जीपमधून जात असताना मुसामध्ये बंदुकीने गोळ्या घालून मूसेवालाचा खून करण्यात आला होता. हल्ल्यानंतर मूसेवाला त्यांच्या जीपमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली आहे.
आता या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. गायकाच्या हत्येची कबुली लॉरेन्स बिश्नोईने दिली होती. आता या हत्येचं महाराष्ट्र कनेक्शनही समोर आलं आहे मूसेवालाच्या हत्येसाठी एकूण 8 शूटर बोलावण्यात आले होते. यात वेगवेगळ्या राज्यांमध्ये हे शूटर मागवण्यात आले होते. यामध्ये पुण्यातील दोन शूटरची नावं समोर आली आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, सिद्धू मुसेवालाची हत्या करणाऱ्या आठ शूटर्सची ओळख पटली आहे. यामध्ये पुण्यातील दोन शूटरचाही समावेश असून संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ अशी त्यांची नावं आहेत. सिद्धू मूसेवालाची हत्या करण्यासाठी एकूण आठ शूटर पंजाब, राजस्थान आणि महाराष्ट्रातून बोलावण्यात आले होते. यात पंजाब आणि राजस्थानमधील प्रत्येक 3 तर महाराष्ट्रातील दोन शूटरचा समावेश होता. संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ बाणखेले खून प्रकरणातील मोक्काचे फरार आरोपी आहेत.. दोन वर्षापासून दोघंही फरार आहेत. आता ते पंजाबमध्ये राहात असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली आहे.