पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘सिरम’ला भेट देणार
संपूर्ण जगाचे लक्ष कोरोना प्रतिबंधक लसीकडे लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘सिरम’ला भेट देणार
संपूर्ण जगाचे लक्ष कोरोना प्रतिबंधक लसीकडे लागले आहे.
पुणे :बारामती वार्तापत्र
देशभरात कोरोना लसीची निर्मिती आणि त्याच्या वितरणाची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज (28 नोव्हेंबर 2020) पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन शहरांचा दौरा करत आहेत. अहमदाबाद, पुणे आणि हैदराबाद या तीन शहरांचा मोदी दौरा करणार आहेत. या तिन्ही ठिकाणी मोदी कोरोना लसीच्या प्रगतीचा आढावा घेतील. (PM Narendra Modi Pune Visit Live Update)
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींचा दौरा अहमदबादमधील जेडियस बायोटेक पार्क या ठिकाणाहून सुरु होईल. सकाळी 9 च्या सुमारास मोदी सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर जातील. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने चांगोदर या ठिकाणी जातील.
चांगोदरमध्ये जेडियस बायोटेक पार्कमध्ये निर्मिती होत असलेल्या कोरोना लसीचा आढावा घेतील.
त्यानंतर मोदी पुण्यासाठी रवाना होतील. पंतप्रधान मोदी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सिरम इन्स्टिट्यूटला भेट देतील. पुण्यानंतर मोदी हैदराबादमधील भारत बायोटेक या ठिकाणी भेट देतील. भारत बायोटेक ही कंपनी कोरोनाची स्वदेशी लसीची निर्मिती करत आहे.
कसा असेल मोदींचा पुणे दौरा?
देशात कोरोनाची साथ आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच महाराष्ट्रात येत आहेत. राजशिष्टाचारानुसार पंतप्रधान एखाद्या राज्यात गेल्यास तेथील मुख्यमंत्री त्यांच्या स्वागतासाठी येतात. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान कार्यालयाकडून स्थानिक प्रशासनाला स्वागत समारंभ आणि भेटीगाठी टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पुण्यात पंतप्रधानांच्या स्वागताला जाणार नाहीत, अशी माहिती राजशिष्टाचार अधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या पुणे दौऱ्यातही काहीसा बदल झाला आहे. यापूर्वीच्या कार्यक्रमानुसार पंतप्रधान मोदी दुपारी एक वाजता सिरम इन्स्टिट्यूटमध्ये येणार होते. मात्र, आता मोदी हे दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत.
मोदींचा पुणे दौरा
पंतप्रधान मोदी 3.50 मिनिटांनी पुणे एअरपोर्टवर दाखल होतील
4.15 वाजता मंजरी हेलिपॅडवर पोहोचतील
4.25 वाजता सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल होतील
त्यानंतर तासभर मोदी सिरम इन्स्टिट्यूटच्या कोरोना लसीचा आढावा घेतील
5.25 वाजता सिरम इन्स्टिट्यूटमधून रवाना होतील