स्थानिक

पक्के अनुज्ञप्तीच्या कोटयामध्ये वाढ

सुटीच्या दिवशी चाचणीची वेळ सकाळी 8 ते दुपारी 2 अशी राहिल.

पक्के अनुज्ञप्तीच्या कोटयामध्ये वाढ

सुटीच्या दिवशी चाचणीची वेळ सकाळी 8 ते दुपारी 2 अशी राहिल.

बारामती वार्तापत्र

केंद्रीय महामार्ग मंत्रालय यांच्याकडील अधिसूचनेनुसार अनुज्ञप्तीविषयीची वैधता 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. प्रलंबितता व गर्दी टाळण्यासाठी सार्वजनिक सुटीच्या दिवशी म्हणजेच शनिवारी व रविवारी कार्यालयात प्रतिदिन 150 या प्रमाणे पक्के अनुज्ञप्तीचा कोटा वाढविण्यात आलेला आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, बारामती यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
सार्वजनिक सुटीच्या दिवशी चाचणीची वेळ सकाळी 8 ते दुपारी 2 अशी राहिल. या सुविधेचा सर्व अनुज्ञप्ती धारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रदेशिक परिवहन अधिकारी, बारामती यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button