आपला जिल्हा

पक्षाने आदेश दिल्यास आगामी निवडणूका स्वबळावर लढवणार – प्रविण माने 

भाजप पक्ष क्रमांक 1 वर ठेवण्याचा दृढ निश्चय

पक्षाने आदेश दिल्यास आगामी निवडणूका स्वबळावर लढवणार – प्रविण माने 

भाजप पक्ष क्रमांक 1 वर ठेवण्याचा दृढ निश्चय

इंदापूर, आदित्य बोराटे –

येत्या काही काळातच स्थानिक स्वराज्य संस्थांचे बिगुल वाजणार असून प्रत्येकाने झाडून कामाला लागण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी इंदापूर विधानसभाचे युवा नेते प्रवीण माने यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणा’ (GST Next Gen Reform ) निर्णयाची घोषणा केली त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू झाली आहे. या बद्दल माहिती सर्वसामान्यांना माहिती व्हावी या हेतूने इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने (दि.३०) सप्टेंबर इंदापूर येथील राधिका मंगल कार्यालय येथे कार्यकर्ता संवाद कार्यक्रम पार पडला. भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी समवेत परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद दिला.

या बैठकीत बोलत असताना, प्रविण माने यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसाठी मरगळ झटकून तयार राहण्याचे आवाहन केले. लवकरच जिल्हा परिषद निवडणूका, पंचायत समिती, नगर परिषद याशिवाय पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीची रणधुमाळी उडणार असल्याचे सूतोवाच माने यांनी दिले.

यावेळी पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या तालुक्यातील प्रत्येक पदवीधरापर्यंत कार्यकर्ता म्हणून आपण सर्वांनी पोहोचायचे असून, पक्षाची ध्येयधोरणा व मोदीजींच्या स्वप्नातील विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कशाप्रकारे सहयोग देऊ शकतो हे प्रत्येक मतदाराला समजावून सांगणे गरजेचे असल्याचे माने यांनी यावेळी सांगितले.

इंदापूर येथे आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष दक्षिण शेखर दादा वढणे तर युवानेते प्रविण माने हे या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून लाभले.

यावेळी कार्यकार्त्यांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदिजींनी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती हि सर्व सामान्य नागरिकांना करून देण्यासाठी, या योजनेचा लाभ समजतील अगदी शेवटच्या नागरिकाला होण्यासाठी सर्वांनी कार्यरत होण्याचे आवाहन माने यांनी केले.

प्रगतीच्या दिशेने वेगवान वाटचाल करणाऱ्या आपल्या देशाची घौडदौड पाहून, या विकास कामात स्वतःचाही हातभार लागावा या हेतून नरेंद्रजी मोदी यांचे नेतृत्व स्वीकारून भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी होण्याऱ्या नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रकाचे यावेळी वढणे व माने यांच्या हस्ते वाटप पार पडले. यावेळी प्रविण माने यांनी सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करून सर्वांना आपल्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी इंदापूर तालुक्यातील सोमनाथ शिंदे व गौतम कांबळे यांनी आपल्या असंख्य सहकाऱ्यांसमवेत पक्षप्रवेश केला, आपला भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारा पक्ष आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसणारे रवीदादा आज पक्षाच्या महाराष्ट्र राज्यातील सर्वोच्च पदावर आहेत हेच त्याचे मुख्य उदाहरण होय.

त्यामुळे नजीकच्या काळात असाच कुणी सामान्य कार्यकर्ता जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य होऊ शकतो असे सांगून माने यांनी पक्षाच्या वरिष्ठांनी आदेश दिल्यास आपण आगामी निवडणूका स्वबळावर लढायची तयारीही आपण ठेवायची असून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणूकीत भाजपा उमेदवारांना आपण सर्वांनी ताकद देऊन आपला पक्ष क्रमांक एक वर ठेवण्याचा दृढ निश्चय या बैठकीत करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रविण माने यांसह शेखर वढणे, मयूर पाटील, माऊली चवरे, मारुती वणवे, सदानंद शिरदाळे, आकाश कांबळे, गजानन वाकसे, नानासाहेब शेंडे,प्रविणकुमार शहा, तानाजी थोरात, बाळासाहेब पानसरे, सचिन आरडे, माऊली वाघमोडे, तेजस देवकाते, राम आसबे, राजकुमार जठार, किरण गाणबोटे, संतोष चव्हाण, विजय घोगरे, अभिजीत घोगरे, अमोल मुळे, मयुर शिंदे, शितल साबळे, माधुरी भराटे, प्रमिला राखुंडे, सुजाता कुलकर्णी, योगिता यादव व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button