पणदरे गावच्या “उपसरपंच पदी” अश्विनी निखिल गायकवाड यांची निवड
भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पणदरे गावच्या “उपसरपंच पदी” अश्विनी निखिल गायकवाड यांची निवड
भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बारामती वार्तापत्र
उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल अश्विनी गायकवाड त्यांचे पॅनेल चे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते आदींनी बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस भवन याठिकाणी सदिच्छा भेट घेतली.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी त्यांचा सत्कार करून चांगली विकासात्मक कामे करण्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच गावातील अडीअडचणी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांचे माध्यमातून सोडवण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
यावेळी बारामती दूध संघ चेरमन संदिप जगताप पाटील खरेदी-विक्री चेअरमन शिवाजीराव टेंगले,बारामती संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष धनवान वदक,बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया चे अध्यक्ष सुनिल बनसोडे,भूषण जगताप, दत्तात्रय जावळे,सागर गायकवाड, दत्ता रुपनवर, रोहन गायकवाड, दिनेश जगताप,सिद्धार्थ सोनवणे,अक्षय गायकवाड, निखिल गायकवाड, विकास राजगुरू, नाना भोसले तसेच भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.