पणदरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अश्विनी निखिल गायकवाड याची बिनविरोध निवड..!
सर्व सदस्य,जेष्ठ नेते, ग्रामस्थांना यांना विचारात घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत
पणदरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अश्विनी निखिल गायकवाड याची बिनविरोध निवड..!
सर्व सदस्य,जेष्ठ नेते, ग्रामस्थांना यांना विचारात घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील महत्वाची ग्रामपंचायत असलेल्या “पणदरे” ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अश्विनी निखिल गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. ऐंशी वर्षांच्या कालावधीत पहिल्यांदाच अनुसूचित जाती मधील अश्विनी निखिल गायकवाड यांची बिनविरोध निवड झाल्याने कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला.
मावळत्या उपसरपंच अर्चना रविंद्र कोकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेल्या उपसरपंच पदासाठी निवडणूक आज घेण्यात आली होती .सरपंच मिनाक्षी जगताप यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदी निवड करण्यात आली. यावेळी अश्विनी निखिल गायकवाड यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध करण्यात आली.
यावेळी ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब भोसले,सर्व सदस्य, तसेच कारखान्याचे माजी व उपाध्यक्ष व संचालक तानाजी कोकरे, एस. एन जगताप, स्वप्निल जगताप, बी. डी. कोकरे , सागर गायकवाड,दत्ता जावळे, गणेश भालेराव , शशिकांत सोनवणे, विशाल घोरपडे ,रोहन गायकवाड, नटराज गायकवाड व इतर मान्यवर उपस्थित होते.
सर्व सदस्य,जेष्ठ नेते, ग्रामस्थांना यांना विचारात घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत असे निवडीनंतर उपसरपंच अश्विनी गायकवाड यांनी सांगितले.